Goregaon Nesco Party: नेस्को पार्टीत ड्रग्ज पुरवणारा अटकेत; कॉन्सर्टमध्ये होता उपस्थित

सात आरोपी गजाआड
Goregaon Nesco Party
Goregaon Nesco PartyPudhari
Published on
Updated on

मुंबई: गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील ड्रग्जपार्टीतील सातवा आरोपी विनित सुनिल गेरेलानी (वय 22) याला वनराई पोलिसांनी बुधवारी अटक केली असून त्याच्याकडून ड्रग्ज घेतल्याचे उघडकीस आले आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी रौनक राहुल खंडेलवाल, आकाश बनमारी सामल, सनी विनोद जैन, बालकृष्णन बलराम कुरुप, प्रतिक बिजेश पांडे आणि आनंद लक्ष्मण पटेल यांना अटक केली असून त्यांच्याही पोलीस कोठडीत 18 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Goregaon Nesco Party
Maharashtra labour rule: माथाडींच्या पाठीवरचे ओझे झाले हलके! पन्नास किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांवर बंदी

शनिवारी नेस्को सेंटरमध्ये एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मद्यप्राशन आणि ड्रग्जचे सेवन केल्यामुळे बिस्मतसिंह सिंह आणि श्रेया राय या दोघांचा मृत्यू झाला तर शीतल साळवी हिच्यावर उपचार सुरू आहेत. वनराई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

बुधवारी पोलिसांनी विनित याला अटक केली. तो उल्हासनगरचा रहिवासी आहे. त्यानेच ते ड्रग्ज आणल्याचा आरोप आहे. विनित हा गोरेगाव येथील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये उपस्थित होता. त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याला अनेकांनी संपर्क साधल्याचे तसेच त्याच्याकडून ड्रग्ज घेतल्याचे उघडकीस आले आहे.

Goregaon Nesco Party
Vidhan Parishad Election: विधान परिषद; कोणाला संधी, कोणाचा पत्ता कटणार? निवडून येण्यासाठी 28 ते 29 मतांचा कोटा आवश्यक

या ड्रग्जचे पेमेंट त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाले आहे. ही रक्कम त्याने पाहिजे आरोपी आयुष साहित्यला दिले होते. आयुष हा ड्रग्ज कोठून आणतो याची त्याला माहिती होती. त्यामुळे त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. तो आयुषच्या नियमित संपर्कात असल्याचे त्याच्या कॉल रेकॉर्डवरून उघडकीस आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news