Mumbai Tree Cutting: गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठी १५२४ वृक्षांवर कुऱ्हाड!

६९५ झाडे तोडण्याचे आणि ६६६ झाडांचे पुनर्रोपण करण्याचे प्रस्तावित; वॉचडॉग फाउंडेशनची पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव मागे घेण्याची मागणी
Tree Cutting
Tree CuttingPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या कामासाठी तब्बल १,५२४ वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्याची तयारी मुंबई महापालिकेने सुरू केली असून, यापैकी ६९५ झाडे तोडणे आणि ६६६ झाडांचे पुनर्रोपण करणे प्रस्तावित आहे.

विकासकामांच्या नावाखाली होणारी ही वृक्षतोड मुंबईकरांच्या आरोग्यासाठी आणि शहराच्या पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरेल, असा इशारा देत ‘वॉचडॉग फाउंडेशनने या प्रकल्पातील वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच, पालिकेने हा प्रस्ताव त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी पत्राद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्ग ते ऐरोली टोल नाक्यादरम्यान गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे बांधकाम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील जंक्शनच्या रुंदीकरण व सुधारणेच्या कामासाठी ही वृक्षतोड होणार असून, पालिकेने यासंदर्भात हरकती व सूचना मागवणारी नोटीस नुकतीच जारी केली आहे.

Tree Cutting
Mahavitaran solar projects: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा फायदा; महाराष्ट्रात वीजमागणीचा विक्रम

ऑक्टोबर हीट आणि पर्यावरणाचा ऱ्हास

यंदा ऑक्टोबर महिन्यात मुंबईत अभूतपूर्व उकाडा व दमट हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. हिवाळ्याच्या उंबरठ्यावर असतानाही तापमानात झालेली वाढ चिंताजनक आहे.

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी, हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी आणि जैवविविधतेचे संतुलन राखण्यासाठी शहरात हरित आच्छादन वाढवण्याची नितांत गरज असताना, अशा पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नावाखाली एकाच वेळी शेकडो झाडे नष्ट करणे गंभीर पर्यावरणीय संकट ओढवून घेण्यासारखे आहे, असे ‘वॉचडॉग फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड.गाॅडफ्रि पिमेंटा यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Tree Cutting
Naigaon water shortage: नायगाव बीडीडी टॉवर्सचा पाणीप्रश्न सुटणार; मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्यांबाबत पालिका-म्हाडा चर्चा

पर्यायी मार्गांचा अवलंब करा

‘विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी देणे थांबवले पाहिजे. झाडांची मोठ्या प्रमाणावर होणारी कत्तल मुंबईतील हवेचा दर्जा खालावण्यास, तापमानवाढीस आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरेल.

त्यामुळे पालिकेने हा प्रस्ताव तातडीने मागे घेऊन कमीत कमी वृक्षहानी होईल अशा पर्यायी मार्गांचा शोध घ्यावा, तसेच, मुंबईचे पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून या वृक्षतोडीच्या प्रस्तावाला ठाम विरोध करावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news