Mumbai School Bus Safety: एका हातात स्टेअरिंग, तर दुसऱ्या हातात मोबाईल!स्कूल बसचालकांचा चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ

गिरगावातील प्रमुख रस्त्यांवर बस चालवताना मोबाईलवर बोलण्याचे प्रकार; शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता
Mumbai School Bus Safety
Mumbai School Bus SafetyPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: जगन्नाथ शंकर शेठ मार्ग ,राजाराम मोहन राय मार्ग, महर्षी कर्वे मार्ग व गिरगावातील इतर मार्गांवरून रोज अनेक स्कूलबस धावत असतात. या बसमधून मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी प्रवास करतात.या स्कूल बसमधील चालक एका हाताने कानावर मोबाईल लावून मित्रमंडळी व नातेवाईकांसोबत गप्पा मारत असतात तर दुसरा हात स्टेअरिंगवर असताे.

बसचालक मोबाईलवर बोलण्यात एवढे मग्न असतात की अनेकदा मागून येणाऱ्या गाड्या त्यांना हॉर्न देऊन पुढे जाण्याचा इशारा देत असतात. परंतु त्यावेळेसही चालकांचे त्यांच्याकडे लक्ष नसते. असाच काहीसा प्रकार बेस्ट बस चालकांबाबतही घडत असतो. परिणामी शालेय विद्यार्थ्यांसोबत बेस्ट प्रवाशांचीही सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

Mumbai School Bus Safety
Sodexo License Suspended: मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील सोडेक्सोचा परवाना निलंबित; किचनमध्ये झुरळे आढळली

अशा या पार्श्वभूमीवर गिरगावकरांनी एका स्कूलबस चालकाचा व्हिडिओ प्रसिद्धी माध्यमांवर व्हायरल करून एका बेजबाबदार चालकावर कारवाईची मागणी करून त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.

तसेच मोबाईलवर बोलत बसणाऱ्या बेस्ट बस चालकांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा चालकांमुळे स्कूल बसमधील चिमुकल्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो, आम्ही गिरगावकर संस्थेचे अध्यक्ष गौरव सागवेकर यांनी दिला आहे.

Mumbai School Bus Safety
Mumbai Local Mega Block: मुंबई लोकलने प्रवास करणार असाल तर लक्ष द्या! रविवारी मेगा ब्लॉक, लोकल सेवांमध्ये बदल

इलेक्ट्रिक दुचाकीस्वारांकडून नियमभंग

इलेक्ट्रिक वाहनांना काही नियमांत सूट असल्यामुळे साहित्य समग्री आणण्यासाठी या गाड्यांचा मोठा वापर केला जातो. परंतु इलेक्ट्रिक दुचाकी चालवणारी मंडळीही वाहन हाताळताना मोठ्या प्रमाणात मोबाईलवर बोलत असताना दिसून येतात. अल्पवयीन मुले मुली ट्रिपल सीट चौबल सीट प्रवास करून थेट अपघातालाच निमंत्रण देत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news