Goregaon News: गोरेगाव सार्वजनिक शौचालय मृत्यूप्रकरणी गाळामालक नवीनभाई चावडा यांना अटक

राम मंदिर परिसरातील घटनेप्रकरणी साई इलेक्ट्रोप्लेट कारखान्याला जागा भाड्याने देणाऱ्या नवीनभाई चावडा यांच्यावर पोलिसांची कारवाई
Goregaon News
Goregaon NewsPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: गोरेगाव पूर्व राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात विषारी रसायनांची बाधा होवून दोन तरुणांचा मृत्यू झाल्‍यानंतर पोलिसांनी साई इलेक्ट्रोप्लेट कारखान्‍याला भाड्याने जागा देणारे मालक नवीनभाई चावडा यांना अटक केली आहे.

विरारला राहणारे अनिल देसाई यांचा भाविक हा मुलगा आयआयटीच्या पहिल्या वर्गात शिकत होता. भाविक गणपती उत्सवासाठी काकाकडे आला होता.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पा चे विसर्जन झाल्यानंतर भाविक, विपुल आणि प्रभाकर हे ईच्छापूर्ती गणेश मंडळ येथे भेटले. रात्री दीड वाजता ते जेवण करून पुन्हा मंडपात आले. मंडपात गप्पा मारत असताना भाविक आणि प्रभाकर हे बाथरूम ला जातो असे सांगून निघून गेले.

बराच वेळ झाला ते परत आले नाही. विपुल याने भाविक आणि प्रभाकर या दोघांना फोन केले. मात्र त्याने फोन उचलले नाही. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तीन जण राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळील सार्वजनिक शौचालयात गेले.

Goregaon News
Tata Sons Listing: टाटा सन्सच्या लिस्टिंगवर नवा ट्विस्ट! नोएल टाटांचा मोठा प्रस्ताव; दोन कंपन्या थेट टाटा सन्समध्ये विलीन होणार?

एका शौचालयाचा दरवाजा अर्धवट उघडा होता. प्रभाकर बेशुद्ध अवस्थेत पडला होता. प्रभाकर ला शौचालयातून बाहेर काढले. दुसऱ्या शौचालयात दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडत नव्हता.

त्या शौचालयात भाविक बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तेथे येणाऱ्या अति उग्र वासाने त्याला उलटी झाली.दोघांना ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. कालिंदा घोगरे यांनी दोघांनाही उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

शौचालयाच्या शेजारी साई इलेक्ट्रोप्लेटचे रसायन चेंबरच्या पाईप लाईन मध्ये टाकले जात होते. ड्रेनेज पाईप लाईन मधून वाहत असलेले विषारी रसायन शौचालयात पसरल्याने त्या दोघांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

चावडा यांनी यांनी आपली जागा कारखाना चालवणारे रामधनी यादव यांना भाड्याने दिली होती. साई इलेक्ट्रोप्लेट नावाने लोखंडी धातू पॉलिश करण्याचे काम सुरू होते आणि यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईड सारख्या धोकादायक रसायनांचा वापर होत होता. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमने ॲसिड, पाणी आणि ड्रेनेजचे नमुने घेतले आहेत.

Goregaon News
Mumbai FDA Raid: मुंबईत एफडीएचा दणका; १३ आस्थापनांचे परवाने निलंबित;कुठे उंदीर तर कुठे झुरळांचा प्रादुर्भाव

फायर ब्रिगेडचे अधिकारी पी. एस. शिंदे आणि बीएमसी अधिकाऱ्यांनी शेजारील गाळ्याचे शटर तोडून पाहणी केली. सायन येथील एमपीसीबीच्या अधिकारी मधुरीमा जोशी यांच्या टीमने घटनास्थळाची पाहणी करून २४ तास हवा आणि प्रदूषणाची गुणवत्ता मोजणारे मॉनिटरिंग डिव्हाईस लावले.

या ठिकाणी साई इलेक्ट्रोप्लेट नावाने लोखंडी धातू पॉलिश करण्याचे काम सुरू होते आणि यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईड सारख्या धोकादायक रसायनांचा वापर होत होता. त्‍याचाच परिणाम सार्वजनिक शौचालयात रासायनिक वायू साचून राहण्‍यात झाला आणि दोन्‍ही मुलांचे त्‍यात बळी गेले.

अनधिकृत बांधकामांवर जेसीबी

दरम्‍यान, सार्वजनिक शौचालयात विषारी रसायनामुळे रविवारी दोन तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पालिका पी.दक्षिण विभागाने शौचालय परिसरासह वाॅर्डातील अनधिकृत बांधकामांविरुद्धची कारवाई तीव्र केली.

सोमवारी अनेक बांधकामांवर जेसीबी फिरविण्यात आला. पी- दक्षिणचे विभागाचे वॉर्ड अधिकारी अनिरुद्ध कुलकर्णी यांनी सांगितले की, सोमवारी महापालिकेच्या पथकाने घटनास्थळ परिसरात अनधिकृतपणे उभारलेले स्टॉल्स आणि फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई केली. ज्या ठिकाणाहून रसायनाची गळती झाली असे म्हटले जाते. त्या जागी पालिकेच्या पथकाला अद्याप पोचता आलेले नाही.

अधिकारी कारखान्‍याबाहेरच; तूर्त अंदाज बांधणेच सुरूही दोन्‍ही मुले रसायनांच्‍या संपर्कात कसे आले, हे शोधण्यासाठी परिसरातील शौचालये आणि सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबर्सची तपासणी केली जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. स्वतंत्र तपास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी अद्यापही कारखान्यात प्रवेश केलेला नाही.

हायड्रोक्लोरिक ॲसिडमुळे हे रसायन शरीरात गेले असण्याची शक्यता पोलीस तपासत आहेत. फॉरेन्सिक अहवाल प्राप्त होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे शक्य नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याचा अर्थ या प्रकरणी दोन्‍ही मुलांच्‍या मृत्‍यूची जबाबदारी निश्‍चित होण्‍यास अवकाश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news