मुंबई : उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या पुढाकारातून उभे राहत असलेले गोराई मँग्रोव्ह पार्क आणि दहिसर मँग्रोव्ह पार्क हे प्रकल्प उत्तर मुंबईच्या हरित ओळखीला नवे परिमाण देणार आहेत.
सुमारे रुपये 110 कोटींच्या एकत्रित खर्चाने हे प्रकल्प उभे राहत आहेत. भारतातील पहिले ‘मँग्रोव्ह-थीम आधारित नागरी जैवविविधता उद्यान’ गोराई मँग्रोव्ह पार्क आणि त्यानंतरचा मोठा प्रकल्प दहिसर मँग्रोव्ह पार्क हे दोन्ही प्रकल्प शाश्वत पर्यटनाला चालना देतील आणि वादळे, समुद्री क्षरण यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून शहराचे नैसर्गिक संरक्षण करतील.
गोयल यांनी या प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर सांगितले की, गोराई मँग्रोव्ह पार्क हा महाराष्ट्र शासनाच्या मँग्रोव्ह सेलद्वारे विकसित होत असलेला भारताचा पहिला मँग्रोव्ह-थीम आधारित नागरी जैवविविधता उद्यान आहे.
“उत्तर मुंबई ते उत्तम मुंबई” या ध्येयदृष्टीला बळकटी देणारा हा प्रकल्प गोराईच्या शांत समुद्रकिनारी परिसरात उभा राहत आहे. सुमारे रुपये 30 कोटी खर्चून साकारण्यात आलेला हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे.
गोराई प्रकल्पाच्या यशानंतर दहिसर मँग्रोव्ह पार्क हा मुंबईच्या इको-टुरिझम क्षेत्रातील पुढचा मोठा टप्पा ठरणार आहे. येथे एकाच ठिकाणी मँग्रोव्ह जंगलाचा विस्तीर्ण प्रदेश आणि महानगराची दाट नागरी रचना अनुभवता येईल. “आकर्षित करा, सहभागी करा आणि शिक्षित करा” या संकल्पनेवर आधारित हा सुमारे रुपये 80 कोटींचा प्रकल्प आहे.
दृष्टिक्षेपात दहिसर मँग्रोव्ह पार्क
एकूण क्षेत्रफळ सुमारे 30 हेक्टर, प्रकल्प खर्च सुमारे रु. 80 कोटी
अधिकृतरीत्या इको-टुरिझम प्रकल्प म्हणून मंजूरी.
मँग्रोव्ह पाथवेज : उद्यानातील सर्व घटकांना जोडणारे माहितीपर मार्ग.
नेचर इंटरप्रिटेशन सेंटर (छखउ) कार्यशाळा हॉल, परिषद कक्ष आणि स्मृतीवस्तू विक्री केंद्र.
400 मीटर लांबीचा मार्ग वॉकओव्हर मँग्रोव्ह ट्रेल.
फ्लोटिंग जेट्टी आणि कयाक ट्रेल्स दुसऱ्या टप्प्यात दहिसर आणि गोराईला जोडणार.
दृष्टिक्षेपात गोराई मँग्रोव्ह पार्क
800 मीटर लांबीचा पर्यावरणपूरक
उंच लाकडी मार्ग (ुेेवशप ारपर्सेीींश ीींरळश्र) मँग्रोव्ह जंगलांमधून निसर्गाचा जवळून अनुभव घेण्याची संधी.
दोन मजल्यांचे मँग्रोव्ह इंटरप्रिटेशन सेंटर
रूट आणि कॅनोपी लेव्हल ऑब्झर्व्हेशन डेक्स
रित लँडस्केपिंग आणि नैसर्गिक सौंदर्य जपणारी बांधकाम रचना.
एकाही मँग्रोव्ह झाडाची कत्तल नाही.