Gold Smuggling: ट्रेडमिलच्या मोटरमध्ये लपवलेले १.१० कोटींचे सोने जप्त; चिनी नागरिकासह दोघांना अटक

या सोन्याची किंमत सुमारे १ कोटी १० लाख रुपये आहे.
Gold Smuggling
Gold SmugglingPudhari
Published on
Updated on

मुंबई: व्यावसायिक मालाच्या आडून सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) उधळून लावला. मुंबईच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये हाँगकाँगहून आयात करण्यात आलेल्या ट्रेडमिलच्या मोटरमध्ये लपवून ठेवलेले ६९१.८७० ग्रॅम २४ कॅरेट सोने जप्त करण्यात आले.

या सोन्याची किंमत सुमारे १ कोटी १० लाख रुपये आहे. या कारवाईत चिनी नागरिकासह आयातदार कंपनीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

डीआरआयच्या मुंबई विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर हाँगकाँगहून आलेल्या ट्रेडमिलच्या व्यावसायिक मालाची तपासणी करण्यात आली. सुरुवातीला हा माल नेहमीच्या व्यावसायिक आयातीचा भाग असल्याचे दिसत होते. मात्र, अधिकाऱ्यांनी ट्रेडमिलच्या मोटरची तपासणी केली असता त्यामध्ये सोन्याचा चापाच्या आकाराचा बार अत्यंत हुशारीने लपविल्याचे आढळले.

Gold Smuggling
Fake Visa Racket: बनावट व्हिसा-तिकिटांच्या व्हॉट्सॲप रॅकेटचा पर्दाफाश; सात वर्षांपासून फरार आरोपीला अटक

डीआरआयच्या प्राथमिक तपासात चिनी नागरिक व त्यांच्या भारतीय साथीदारांनी वैध व्यावसायिक आयातीचा वापर सोन्याची तस्करी करण्यासाठी केल्याचा संशय आहे. मशीनरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या भागांमध्ये सोने लपवून ते सीमाशुल्क तपासणीपासून वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

सोने जप्त केल्यानंतर डीआरआयने तपासाचा विस्तार केला. मुंबई, चेन्नई, तिरुवल्लूर आणि चेंगलपट्टू या ठिकाणी संबंधित संशयितांशी निगडित ठिकाणी झडती घेण्यात आली. या कारवाईत तस्करीच्या नेटवर्कमधील अन्य सदस्य, सोन्याचा स्रोत, आयातीची कागदपत्रे आणि यापूर्वी अशाच पद्धतीने माल भारतात आणण्यात आला होता का, याचा तपास केला जात आहे.

Gold Smuggling
Jio World Plaza Security Breach: बनावट ओळखपत्र अन् बंदूक, जिओ वर्ल्डमध्ये घुसखोरी; दोघा जणांना अटक

या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय नेटवर्क कार्यरत असल्याचा डीआरआयला संशय आहे. चिनी नागरिकांसोबत भारतीय साथीदारांची भूमिका काय होती, सोन्याची डिलिव्हरी नेमकी कोणाला होणार होती आणि यापूर्वी अशा किती खेपा भारतात आणण्यात आल्या, याचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news