Flood Affected Farmer Aid | पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी गिरीश महाजन यांनी वर्षभराचा पगार दिला मुख्यमंत्री सहायता निधीस

Girish Mahajan | धनादेश व संमतीपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द
Flood affected farmers CM Relief Fund
धनादेश व संमतीपत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देताना मंत्री गिरीश महाजन(Pudhari Photo)
Published on
Updated on

Flood affected farmers CM Relief Fund

मुंबई : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्री पदाचा वर्षभराभरातील वेतन रक्कम ३१ लक्ष १८ हजार २८६ रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहेत. त्याबाबतचे धनादेश व संमतीपत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज (दि.७) मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी सादर केले.

राज्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान तसेच राज्यातील विविध भागात महापुरामुळे झालेले नुकसान यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून नागरिकांना मदत करण्यात येत आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांना भेट देऊन झालेल्या नुकसानीचे तसेच पाहणी केली आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मंत्री महाजन यांनी भेटी घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे.

Flood affected farmers CM Relief Fund
Maharashtra Cabinet Decision: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

आपला वर्षभराचा पगार देणारे ते राज्यातील पहिलेच मंत्री ठरले आहे. सद्याच्या मंत्री पदाची शपथ घेतल्या पासून डिंसेबर 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीचे संपूर्ण वेतन ३१ लक्ष १८ हजार २८६ रूपये त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. अनेक सेवाभावी संस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे दिले आहेत.

राज्यात मुसळधार पाऊस , तसेच महापुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या संकटात जनतेच्या व शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर आहे. शासनाकडून त्यांना योग्य ती मदत मिळत असताना आपला देखील त्यामध्ये सहभाग असावा, म्हणून माझ्या मंत्री पदाचे वर्षभराचे एकूण पगार ३१ लक्ष १८ हजार २८६ रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस देत आहे, असे महाजन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news