Girgaon Best Bus Update | गिरगावात बेस्ट बस खड्ड्यात रुतली मेट्रोच्या कामाचा बेस्ट प्रवाशांना फटका

Girgaon Best Bus Update | कंडक्टरने सावधगिरी बाळगून लागलीच प्रवाशांना बस मधून खाली उतरवले.
Girgaon Best Bus Update
Girgaon Best Bus UpdateOnline Pudhari
Published on
Updated on

Girgaon Best Bus Update

मुंबई : गिरगावातील ठाकूरद्वार जंक्शन जवळ आज सकाळी बेस्ट ची १२१ क्रमांकाची बस ठाकुरद्वार नाक्यावर येताच बस खालीची माती खचून ती बस खड्ड्यात रुतली त्यावेळेस बसमधून असंख्य प्रवासी प्रवास करत होते ही बस भुलेश्वरच्या दिशेने जात होती.

Girgaon Best Bus Update
Housing society maintenance : विविध क्षेत्रफळांच्या फ्लॅटना सारखेच देखभाल शुल्क

कंडक्टरने सावधगिरी बाळगून लागलीच प्रवाशांना बस मधून खाली उतरवले. ज्या ठिकाणी बस खड्ड्यात रुतली त्या ठिकाणी गिरगाव मेट्रो स्थानकाचे काम जोमाने सुरू आहे. ज्यावेळेस गिरगावात मेट्रोचे काम सुरू झाले होते त्यावेळेस जगन्नाथ शंकर शेठ मार्गावरती रस्ता खचून भला मोठा खड्डा पडला होता.

दरम्यान घटना घडल्यानंतर देखील या ठिकाणी कोणीच मदतीला आले नव्हते हे प्रत्यक्षदर्शी रमेश अहिरेकर यांनी मुंबई महानगरपालिकेला मोबाईल वरून कळवून घटनेची माहिती दिल्याचे सांगितले. सदर बस भुलेश्वरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान साडेतीन तासानंतर या बसला एका क्रेनच्या सहाय्याने बसच्या चाकांमध्ये पट्टा बांधून बाहेर काढण्यात यश आले त्यानंतर बस मार्गस्थ झाल्याची माहिती मिळाली आहे.

Girgaon Best Bus Update
Sudhakar Badgujar joins BJP | ठाकरेंच्या सेनेला धक्का ? हकालपट्टी झालेले उपनेते सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार

बस रुतलेल्या ठिकाणी सकाळपासून राजकीय नेते हजेरी लावत होते. मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी वायब्रेशन होऊन जमिनीखालची माती सरकली आहे गेल्या सात वर्षापासून या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असून याबाबत पाहिजे तशी काळजी कंत्राटदाराने घेतलेली नाही तसेच ड्रेनेज लाईन तुटून खालच्या खाली पाणी वाहत असल्यामुळे जमीन खालीची माती विस्कळीत झाली आहे त्यामुळे सदरची घटना घडल्याचे शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख दिलीप नाईक यांनी म्हटले आहे.

या घटनेत उबाटा पदाधिकाऱ्यांनी मात्र महानगरपालिकेवरती आरोप केला आहेत काही दिवसांपूर्वी हा ठाकूरद्वार बाबासाहेब जयकर मार्ग रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले होते परंतु ठाकूरदार जंक्शन जवळ मात्र भराव घालण्यात आला नव्हता. मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे सदरची घटना घडल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news