Gas connection scam : घाटकोपरमध्ये गॅसजोडणी बंद करण्याची बतावणी करून दोन लाखांची फसवणूक

घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू
Gas connection scam
घाटकोपरमध्ये गॅसजोडणी बंद करण्याची बतावणी करून दोन लाखांची फसवणूकpudhari photo
Published on
Updated on

कुर्ला ः बील न भरल्याने गॅस जोडणी बंद करत असल्याची बतावणी करून एका व्यक्तीच्या बँक खात्यातून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपीने दोन लाख रुपये काढल्याचा प्रकार घाटकोपर येथे समोर आला आहे. याबाबत घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

इराण-इस्राईल युद्धामुळे सध्या गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याचाच फायदा सध्या ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे घेत आहेत. घाटकोपर परिसरात राहणारे राजेश गाला (51) यांना देखील दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एका अनोळखी इसमाने फोन केला. आपण महानगर गॅस कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत, आरोपीने तुम्ही बील न भरल्याने तुमची गॅस जोडणी बंद करत असल्याचे सांगितले.

Gas connection scam
Minor girl assault case : नोकरीच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर मित्राकडूनच अत्याचार

मात्र मागच्या महिन्यात बील भरले असल्याचे गाला यांनी आरोपीला यावेळी सांगितल्यानंतर आरोपीने बील अपडेट झाले नसल्याचे त्यांना सांगितले. तत्काळ बील अपडेट करा अन्यथा गॅस जोडणी बंद करण्यात येईल, अशी बतावणी यावेळी आरोपीने केली.

अशी झाली फसवणूक

गाला यांनी अपडेटची प्रक्रिया आरोपीला विचारली असता त्याने त्यांना एक लिंक पाठवली. ही लिंक उघडल्यानंतर गाला यांनी त्यांच्या बँक खात्याची काही माहिती यामध्ये भरली. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून एक लाख 88 हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचे त्यांना समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Gas connection scam
Prabhadevi residents resettlement : प्रभादेवी पूलबाधितांना घरे बदलून मिळणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news