Ganeshotsav UNESCO World Heritage: महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला मिळणार जागतिक ओळख; UNESCOच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी सरकारची तयारी

गणेशोत्सव लवकरच युनेस्कोच्या यादीत
Ganpati
GanpatiPudhari
Published on
Updated on

मुंबई: महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या 'जागतिक वारसा' यादीत स्थान मिळवून देण्यासाठी गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. विविध विभागांवर उपक्रम राबविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण न राहता सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक अभिसरणाचे माध्यम बनावे, या दृष्टीने राज्य शासनाने सर्व यंत्रणांना सज्ज होण्याचे निर्देश दिले आहेत.

Ganpati
Antara Banerjee RPF Case: आरपीएफवर ब्लेडने हल्ला; अभिनेत्रीवर गुन्हा दाखल

असे आहेत उपक्रम

1. दीड कोटींची बक्षिसे व राज्यस्तरीय स्पर्धा

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत राज्यातील सुमारे ४८० सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना १ कोटी ५० लाख रुपयांची पारितोषिके दिली जातील.

2.परदेशात सांस्कृतिक कार्यक्रम

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांसह भारतातील १० राज्यांत आणि विदेशातील एका देशात तसेच नवी दिल्लीत ५ दिवस व मुंबईत ८ दिवस विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील.

Ganpati
BKC Metro 2B: मेट्रोच्या कामामुळे बीकेसीतील फूटपाथ गायब; डायमंड मार्केट येथील फूटपाथवर बांधकामाचे साहित्य

3. चित्रनगरी व रील्स स्पर्धा

दादासाहेब फाळके चित्रनगरीतर्फे गणपतीविषयक 'रील्स स्पर्धा' आणि गणेशोत्सवावर आधारित मराठी चित्रपटांचा सन्मान.

4. डिजिटल उपक्रम व ऑनलाइन दर्शन

राज्यातील प्रमुख गणेश मंदिरांचे ऑनलाइन दर्शन घडवण्यासाठी विशेष पोर्टल आणि घरगुती गणपतींच्या छायाचित्रांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला जाणार आहे.

शासकीय विभागांची एकत्रित मोहीम

1. आरोग्य व ऊर्जा : गर्दीच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी, सीपीआर प्रशिक्षण शिबिरे, तसेच पर्यावरणपूरक सौरऊर्जा व एलईडी सजावटीला प्रोत्साहन.

2. शिक्षण व मराठी भाषा : शाळा-महाविद्यालयांमध्ये शाडूच्या मूर्तींच्या कार्यशाळा, रोबोटिक्स देखावे, गणेश-विज्ञान परिसंवाद आणि काव्यवाचन स्पर्धा.

3. दिव्यांग व महिला सबलीकरण : दिव्यांगांसाठी आरतीच्या ठिकाणी सांकेतिक भाषा व सुलभ दर्शनाची सोय. तसेच महिला बचत गटांसाठी मोदक व पूजा साहित्याच्या विक्रीचे स्टॉल्स.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news