Ganeshotsav Bus Fare: गणपतीसाठी कोकणात जाणार? खासगी बसचे भाडे ४५०० रुपयांपर्यंत; प्रवाशांना मोठा फटका

ऐरवी हा दर १ हजार रुपये असतो, पण गणेशोत्सवात तो वाढवला जातो.
Ganeshotsav Bus Fare
Ganeshotsav Bus FarePudhari
Published on
Updated on

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या मुंबई परिसरातील नोकरदारांची धावपळ सुरू झाली आहे. रेल्वेच्या विशेष गाड्यांचे आरक्षण संपल्याने आता एसटी आणि खासगी बसशिवाय पर्याय नाही.

मात्र, काही ट्रॅव्हल्सने प्रवासासाठी प्रत्येकी १५०० ते साडेचार हजार रुपये दर ठेवला आहे. ऐरवी हा दर १ हजार रुपये असतो, पण गणेशोत्सवात तो वाढवला जातो.

गणपतीसाठी साडेतीन हजार खासगी बसेस दरवर्षी कोकणात गणपतीसाठी मुंबई महानगर क्षेत्रातून सुमारे १२ ते १३ लाख जण जातात. सुमारे तीन ते साडेतीन हजार खासगी बसेस धावतात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बसच्या तिकिटात भरमसाट वाढ करण्यात आली आहे.

हंगामात एसटी तिकिटाच्या दीडपट दरवाढ करण्याची खासगी ट्रॅव्हल्स बसला मंजुरी आहे. मात्र, प्रत्यक्षात तिकीट दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Ganeshotsav Bus Fare
Pen Ganesh Idol Business: पेणचा गणेशमूर्ती उद्योग 100 कोटींचा टप्पा गाठणार; पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींच्या मागणीत २५ टक्क्यांनी वाढ

१२ सप्टेंबरचे खासगी बसचे भाडे

मुंबई-सिंधुदुर्ग : २ ते ४,०००

मुंबई-कुडाळ : २ ते ३,५००

मुंबई-कणकवली : २ ते ४,०००

मुंबई-सावंतवाडी : ३ ते ४,५००

  • १३ लाख चाकरमानी गणपतीसाठी दरवर्षी मुंबई महानगर क्षेत्रातून कोकणात जातात

  • १,१३,००० प्रवाशांनी मुंबईहून सुटणार्‍या विशेष रेल्वे गाड्यांमध्ये केले तिकिट आरक्षित

  • ७.७७ कोटी रुपये इतका महसूल मिळाला रेल्वेला यंदाच्या गणेशोत्सव हंगामात

Ganeshotsav Bus Fare
Pharmacy College Rules: शिक्षक नाहीत, तर मान्यताही नाही! नव्या फार्मसी महाविद्यालयांसाठी पीसीआयचे कडक निकष
  • २७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबरदरम्यान मध्य रेल्वेच्या २०० विशेष आरक्षित व ६२ अनारक्षित फेर्‍या

  • ७ सप्टेंबर ते २६ सप्टेंबरदरम्यान ५४ आरक्षित विशेष फेर्‍या चालवणार पश्चिम रेल्वे

  • २,९०५ प्रवाशांनी तिकिटे आरक्षित केली आहेत आतापर्यंत पश्चिम रेल्वेच्या गाड्यांची

  • ५,२०० गणपती स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला यंदा एसटी महामंडळाने

  • ६१२ एसटी गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आतापर्यंत. यात ३८७ गाड्या ग्रुप बुकिंगच्या

  • १२, १३ सप्टेंबरला जाणार्‍यांची संख्या सर्वाधिक. त्यानुसार सर्वाधिक एसटी गाड्यांचे आरक्षण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news