

Ganeshotsav festival : गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्याचा उत्सव म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा आज (दि. १०) सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारयांनी विधान परिषदेत केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गणेशोत्सवाबाबत घेतलेली सकारात्मक भूमिका यांनी स्पष्ट केले.
भाजपाचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने यांनी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना आशिष शेलार यांनी रासने यांचे आभार मानले. ते म्हणाले की, राज्यात सर्वप्रथम १८९३मध्ये लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सुरु केला. त्यापूर्वी महाराष्ट्रातील घरोघरी हा उत्सव सुरु होता. काही लोकांनी वेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला बाधा आणली; पण या सर्व स्पीड ब्रेकरला बाजू करण्याचे काम केले. देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयासमोर गणेशोत्सवाबाबत स्पष्ट भूमिका घेतली. पीओपी मूर्तीबाबत निर्बंध हटवले.विसर्जन परंपरागत करण्याचे धोरण आम्ही न्यायालयासमोर मांडत आहोत.राज्य सरकारचे धोरण आडकाठीचे असणार नाही.देशात आणि जगात गणेशोत्सवाची व्यापती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटीबद्ध राहिल. त्यामुळेच महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव उत्सव म्हणून घोषित करेल हे मी आजच स्पष्ट करतो".
यावेळी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधनाता शेलार म्हणाले की, तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी शंभर वर्षाच्या परंपरेला खंडित केले. लालबागचा राजा देखील एक वर्ष बसला नाही. ही भूमिका तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या यालयात केला; पण महायुतीच्या सरकारने सर्व स्पीड ब्रेकरला बाजूला केलं. मी न्यायाधीशाचं नाव घेणार नाही, ते निवृत्त झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून झालेल्या निवाड्यात जणू पोलिसांनी, महापालिकांनी परवानगीच देऊ नये यासाठी प्रयत्न सुरु होता.
देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयासमोर गणेशोत्सवाबाबत अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरीस मूर्तींवरील निर्बंध हटवण्यात आले असून, विसर्जन परंपरागत पद्धतीनेच व्हावे, असे धोरण सरकार न्यायालयासमोर मांडत आहे. राज्य सरकारचे धोरण गणेशोत्सवासाठी कोणत्याही प्रकारे आडकाठीचे असणार नाही,” असे आशिष शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाला 'महाराष्ट्राचा राज्य उत्सव' म्हणून मान्यता द्यावी आणि पुण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपाचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने यांनी केली हाेती.