

Mumbai Ganpati Mandal Agaman Sohla 2025
मुंबई : अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुरू केली असून, गणरायांचे आगमन होऊ लागले आहे. रविवार (दि.3 ऑगस्ट) रोजी मुंबईतील आठ मोठ्या मंडळांच्या बाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटात, वाजत-गाजत झाले.
राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा बहाल केल्याने मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अधिकच उत्साह जाणवत आहे. त्याचे प्रतिबिंब मंडपात येणार्या गणेशमूर्तींच्या आगमनावेळी जाणवले. नेहमीपेक्षा अधिक गर्दी या वेळेच्या आगमन मिरवणुकींत दिसून आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायांच्या मूर्ती मंडपात दाखल झाल्या.
मोठ्या मंडळांनी आपले गणपती मंडपात नेण्यासाठी रविवारी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. मंडपात सजावट करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी दरवर्षी किमान पंधरा दिवस आधीच सार्वजनिक गणपतीचे आगमन होते.
यावेळी आगमन सोहळ्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशा, बेंजो सोबत घेऊन गणपतीच्या कारखान्यांमध्ये मोठी गर्दी केली होती. हा आगमन सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी लालबाग परळ परिसरात मोठी गर्दी केली होती. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. अनेक ठिकाणी कोंडी झाली होती.
रविवारी आगमन झालेले गणराय
काळाचौकीचा महागणपती
फोर्टचा राजा
खेतवाडीचा राजा
परळचा मोरया
धारावीचा सुखकर्ता
मुंबईचा मोरया
कुर्ल्याचा महाराजा
सुंदरबागचा राजा
मुंबईतील गणपती आगमन सोहळे
10 ऑगस्ट 2025
मुंबईचा सम्राट (खेतवाडी)
मुंबईचा महाराजा (खेतवाडी)
अखिल चंदनवाडी
परळचा महाराजा
करी रोडचा राजा
खेतवाडीचा विघ्नहर्ता
परळचा सम्राट
माझगावचा मोरया
खेतवाडीचा चिंतामणी
ताडदेवचा राजा
15 ऑगस्ट 2025
खेतवाडीचा लंबोदर
मुंबईचा विघ्नहर्ता
हुकमिल लेनचा राजा
मुंबईचा लंबोदर
मुंबईचा इच्छापूर्ती
घाटकोपरचा चिंतामणी
फोर्टचा लाडका
मुंबईचा विघ्नहर्ता अँटॉपहिल
परळचा लंबोदर
17 ऑगस्ट 2025
चिंचपोकळीचा चिंतामणी
परळचा राजा
उमरखाडीचा राजा
गिरगावचा राजा
लोअर परळचा लाडका
मुंबादेवीचा गणराज
खेतवाडीचा महाराजा
काळाचौकीचा महाराजा
कुलाब्याचा लाडका
बाप्पा खेतवाडीचा
अँटॉपहिलचा महाराजा
सायनचा इच्छापूर्ती
दादरचा विघ्नहर्ता