

ठळक मुद्दे
गिरगाव चौपाटीवर जेलीफिशसदृश विषारी ब्लू बॉटलचा अर्थात ‘स्टिंग रे’चा वावर
दरवर्षी मुंबईमधील समुद्रकिनार्यांवर ब्लू बॉटल दृष्टीस पडतात
भाविकांना मत्स्यदंश : काळजी घेण्याचे आवाहन
मुंबई : गेल्या आठवड्यात कोसळलेला मुसळधार पाऊस आणि समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वाहणारे वारे यामुळे गिरगाव चौपाटीवर जेलीफिशसदृश विषारी ब्लू बॉटलचा अर्थात ‘स्टिंग रे’चा वावर वाढला आहे.
त्यामुळे गणपती विसर्जनासाठी चौपाटीवर येणार्या भाविकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले. दरवर्षी मुंबईमधील समुद्रकिनार्यांवर ब्लू बॉटल दृष्टीस पडतात. त्यांनी अनेक पर्यटकांना त्यांनी दंश केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानुसार, मत्स्यव्यवसाय विभागाने गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान मुंबई येथील समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये या माशांचा भाविकांना मत्स्यदंश होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.
गणेश विसर्जन महानगरपालिकेच्या जीवरक्षक व यंत्रणेमार्फत करावे.
विसर्जनादरम्यान भक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करू नये. पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा.
मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक 108 रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात केली आहे.