11th admission registration : अकरावीची प्रवेश नोंदणी धीम्या गतीने

महामुंबईत केवळ 56 हजार 404 विद्यार्थ्यांची नोंदणी
11th Admission
11th AdmissionPudhari
Published on
Updated on

मुंबई : शैक्षणिक सत्र 2026-27 साठी इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 10 एप्रिलपासून सुरुवात झाली असूनही राज्यभरातून आतापर्यंत 2 लाख 80 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाच्या पहिल्या भागाची अंतिम नोंदणी केली आहे. मुंबई विभागातही प्रतिसाद मर्यादित असून एकूण 56 हजार 404 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

गेल्या वर्षी अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जात ही प्रक्रिया पार पडली होती. यंदा मात्र ती अधिक सुरळीत व्हावी यासाठी शिक्षण संचालनालयाने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणीची अंतिम मुदत 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. या कालावधीत दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

11th Admission
11th Admission: अकरावी प्रवेशासाठी 58 हजार नोंदणी

गुरुवारपर्यंतची नोंदणी

  • मुंबई शहर/उपनगर - 25,490

  • ठाणे - 18,274

  • रायगड - 5,917

  • पालघर- 6,723

  • इतर जिल्हे -2,23,037

  • एकूण-- 2,79,441

11th Admission
11th admission guidance: अकरावी प्रवेशाचे यूट्यूब लाईव्हद्वारे आज मार्गदर्शन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news