Artificial Flavour in Rum: रममध्ये 'रम फ्लेवर' वापरण्यास एफडीएची बंदी; मॅकडोवेल्स, ओल्ड मॉन्क कंपन्यांची हायकोर्टात धाव

रममध्ये रम फ्लेवर मिसळणे ही गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून चाललेली व्यावसायिक पद्धत आहे.
Alcohol
Alcohol File Photo
Published on
Updated on

मुंबई: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने रम आणि व्हिस्की उत्पादनांमध्ये कृत्रिम फ्लेवर्सचा वापर केल्याबद्दल काही प्रमुख ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या बंदीविरोधात 'मॅकडोवेल्स रम' बनवणारी 'युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड' आणि 'ओल्ड मॉन्क'चे उत्पादक 'मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर ब्रुअरीज' यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर सोमवार, १० ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

उत्पादक कंपन्या रममध्ये वरून 'रम फ्लेवर' आणि व्हिस्कीमध्ये 'व्हिस्की फ्लेवर' मिसळत आहेत. यामुळे मद्याची नैसर्गिक चव लपवली जाते आणि ग्राहकांची दिशाभूल होते, असे अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने याचिकेत म्हटले आहे.

Alcohol
Mumbai Gold Market: मुंबईत तीन महिन्यांत ग्राहकांनी काढले २५० टन सोने मोडीत; मुंबईसह उपनगरांत ३७५ कोटींची उलाढाल

जर कंपन्यांनी आपल्या उत्पादनांचे लेबल बदलून 'रम' ऐवजी 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट' असे केले, तर बंदी मागे घेण्याची तयारी प्राधिकरणाने दर्शवली आहे. रममध्ये रम फ्लेवर मिसळणे ही गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून चाललेली व्यावसायिक पद्धत आहे.

यामुळे आरोग्याला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. अचानक लेबल्स बदलणे अत्यंत गुंतागुंतीचे असून त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी मिळणे ही प्रदीर्घ प्रक्रिया आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला असून अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाला बंदी उठवण्याबाबत निर्देश देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली आहे.

Alcohol
Mumbai FDA Action: मुंबईतील हॉटेलांवर FDAचा दणका! दादरच्या ‘इट निनो’सह चार हॉटेलांचे परवाने निलंबित

याप्रकरणी सोमवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर दोन्ही याचिकांवर एकत्र करून सुनावणी होणार आहे. कोणतीही गोष्ट एका रात्रीत पूर्णपणे बंद केली जाऊ शकत नाही. मात्र, या तांत्रिक बाबींवर अंतिम निर्णय सोमवारच्या सुनावणीत स्पष्ट होईल, असे खंडपीठाने प्राथमिक सुनावणीवेळी म्हटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news