शाळेची फी भरण्याची बतावणी करुन व्यापार्‍याची फसवणुक

बोगस सोने गहाण ठेवणार्‍या दोन महिलांना अटक व कोठडी
Fraud News In mumbai
शाळेची फी भरण्याची बतावणी करुन व्यापार्‍याची फसवणुकPudhari File Photo
Published on
Updated on

शाळेची फी भरण्याची बतावणी करुन एका ज्वेलर्स व्यापार्‍याची फसवणुक केल्याप्रकरणी दोन महलांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली. आर्ची योगेश गंगावणे आणि शर्मिला महादेव देठे अशी या दोघींची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्यांना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बोगस सोने गहाण ठेवून त्यांनी व्यापार्‍याची फसवणुक केल्याचे पोलिसांनी सांगितले. नवी मुंबईतील रहिवाशी असलेले तक्रारदार ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचा जोगेश्‍वरी एक सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान आहे. गेल्या महिन्यांत त्यांच्या दुकानात दोन महिला आल्या होत्या.

Fraud News In mumbai
फेक मेसेज करून केली हजाराेंची फसवणुक

त्यांनी मुलांच्या शाळेची फी भरायची आहे असे सांगून सोने गहाण ठेवायचे आहे असे सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनी ते दागिने ठेवून त्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये दिले होते. या दोन्ही महिलांना एका आठवड्यात पैसे परत करुन दागिने घेऊन जाण्याचे आश्‍वासन दिले होते, मात्र एक आठवडा उलटूनही त्या दोघीही दुकानात आल्या नव्हत्या. याच दरम्यान त्यांचा भाऊ दुकानात आला होता. त्याने दागिन्यांची पाहणी केल्यानंतर ते दागिने बोगस असल्याचे सांगितले. या महिलांकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या महिलांचा शोध सुरु केला होता.

Fraud News In mumbai
नोकरीचे अमिष दाखवून दांपत्याकडून युवकाची फसवणुक

ही शोधमोहीम सुरु असताना दुकानातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आर्ची गंगावणे आणि शर्मिला देठे या दोघींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघींनाही पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक केली. सध्या त्या दोघीही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का, या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news