Jogeshwari POCSO Case: जोगेश्‍वरीत चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; २७ वर्षांच्या आरोपी मजुराला अटक

याप्रकरणी लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच २७ वर्षांच्या आरोपी मजुराला आंबोली पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
Jogeshwari POCSO Case
Jogeshwari POCSO CasePudhari
Published on
Updated on

मुंबई: चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार जोगेश्‍वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच २७ वर्षांच्या आरोपी मजुराला आंबोली पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

३८ वर्षांची तक्रारदार महिला ही जोगेश्‍वरी परिसरात राहत असून घरकाम करते. तिची चार वर्षांची मुलगी आहे. याच परिसरात अनिलकुमार नावाचा २७ वर्षांचा तरुण राहत असून तो मजुरीचे काम करतो.

Jogeshwari POCSO Case
Dahi Handi Lavani Controversy: महाराष्ट्रात बिहारच्या संस्कृतीची घुसखोरी; दहीहंडी उत्सवातील अश्लील नृत्यांवर टीकेची झोड

ते एकमेकांच्या परिचित आहेत. गुरुवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास मुलगी एकटीच असल्याचे पाहून त्याने तिला त्याच्या रुममध्ये घेऊन आला होता. तिथेच त्याने तिच्याशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता.

काही वेळानंतर त्याने तिच्याशी लैंगिक अत्याचार केला होता. हा प्रकार दुसर्‍या दिवशी मुलीने तिच्या आईला सांगितला होता. त्यानंतर तिने आंबोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

Jogeshwari POCSO Case
Rahul Gandhi on MPSC Student Protest: एमपीएससीवर भाजपचा ताबा? राहुल गांधींचा सरकारवर गंभीर आरोप; विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा

तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच शुक्रवारी रात्री उशिरा अनिलकुमार या आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिंडोशीतील विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news