

मुंबई : उबाठा सेनेचा जुना चेहरा आणि माजी आमदार राजन तेली यांनी उबाठा गटाला रामराम ठोकत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार दीपक केसरकर, मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत यांच्यासह जिल्ह्याचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजन तेली शिवधनुष्य हाती घेणार अहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्हा बँक प्रकरणात तेली यांच्यावर झालेले आरोप आणि प्रसिद्ध झालेल्या पत्राला उत्तर देताना तेलींनी काल झालेले आरोप हे राजकीय सूडबुद्धीतून केलेले आहेत. सत्य लपवता येणार नाही आणि माझ्यावर जनतेचा विश्वास आहे. या आरोपांचा माझ्या राजकीय आयुष्यावर काहीही परिणाम होणार नाही असं जाहीर केल होत आणि याच पार्श्वभूमीवर आजचा त्यांचा शिंदे गटात प्रवेश हा उबाठा सेनेला मोठा धक्का आणि शिंदे- आणि आमदार निलेश राणे यांच्या गटासाठी मोठं बळ ठरणार आहे