FMGE Fake Marksheets: एफएमजीई नापास, तरी डॉक्टर म्हणून नोंदणी; बनावट कागदपत्रांच्या रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश

१९ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, आणखी १६ जण आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती
Arrested
ArrestedPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर भारतात डॉक्टर म्हणून काम करण्यासाठी आवश्यक असलेली एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण न झालेल्यांना बनावट गुणपत्रिका व प्रमाणपत्रांच्या आधारे वैद्यकीय नोंदणी मिळवून देणारे रॅकेट महाराष्ट्र सायबर पोलिसांनी उघडकीस आणले आहे.

या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या संपर्कात आणखी १६ जण असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे व्यवस्थापक राकेश बालाजी वाघमारे (४०) यांनी तक्रार दिली आहे. ते जे. जे. रुग्णालयातील आरएमओ क्वार्टर्स येथे राहतात. परिषदेच्या नोंदणी प्रक्रियेदरम्यान काही उमेदवारांची कागदपत्रे संशयास्पद आढळल्यानंतर हा प्रकार समोर आला.

Arrested
IIT Bombay Exam Rules: आयआयटी मुंबईचा मोठा निर्णय! परीक्षा गैरप्रकारांचे कठोर नियम स्थगित; विद्यार्थ्यांना मिळणार बाजू मांडण्याची संधी

पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड निवेदनानुसार, या रॅकेटमध्ये एफएमजीई परीक्षेत अपयशी ठरलेल्या परदेशी वैद्यकीय पदवीधरांना बनावट गुणपत्रिका, तात्पुरते वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र, इंटर्नशिप पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे तसेच अन्य कागदपत्रे उपलब्ध करून दिल्याचा संशय आहे.

बनावट कागदपत्रे तयार करून ती महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या नोंदणी पोर्टलवर सादर करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या नोंदणी पोर्टलचा लॉगिन किंवा प्रवेश आरोपींना कोणी उपलब्ध करून दिला, बनावट कागदपत्रे नेमकी कुठे तयार झाली आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास केला जात आहे. मोबाइलमधील संभाषणे, संदेश, ई-मेल, आर्थिक व्यवहार आणि अन्य डिजिटल पुराव्यांचे विश्लेषणही करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news