Machine Collapse: उड्डाण पुलासाठी खोदकाम करणारे मशिन रस्त्यात कोसळले; पोलीस शिपाई संतोष चव्हाण यांचा जागीच मृत्यू

चेंबूर ते मानखूर्द या 15 मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना 5 ते 6 तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.
Machine Collapse
Machine CollapsePudhari
Published on
Updated on

कुर्ला: सायन-पनवेल मार्गावरील मानखुर्द परिसरात मंगळवारी रात्री खोदकाम करणारे एक मशीन अचानक रस्त्यावर कोसळले आणि बुधवारी या मार्गावर दिवसभर अभूतपुर्व वाहतूक कोंडी झाली. चेंबूर ते मानखूर्द या 15 मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना 5 ते 6 तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.

24 तास उलटून गेले तरी ही वाहतूक कोंडी सुरूच होती. वाहन चालकांना कोणतेही निरोप येत नसल्याने जो -तो या मार्गावर आला की कोंडीत अडकला, असा सिलसिला रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला. या कोंडीत अडकून पडलेल्या वाहनांमधील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मुंबईचे पोलिसही मदतीला नव्हते आणि मुंबईचे स्पीरिटही धावून आले नाही.

Machine Collapse
War Impact: डोंबिवली-अंबरनाथ औद्योगिक वसाहती अडचणीत; आखाती युद्धामुळे दर महिन्याला 1 हजार कोटींचे नुकसान

वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी काही महिन्यांपासून मानखुर्द परिसरात दोन उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. यासाठी पत्रे लावून आधीच अर्धा रस्ता बांधकामाने काबीज केला आहे. इथे पिलर उभारण्यासाठी मोठ्या मशीनकडून खोदकाम सुरू आहे. मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास खोदकाम करणारे मशीन अचानक रस्त्याच्या मधोमध कोसळले. त्यात एका पोलीसाचा दुर्दैवी मृत्यू ओढवला.

कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणेने मंगळवारी रात्रीच हे मशीन रस्त्याच्या बाजूला करणे अपेक्षित होते. मात्र ते बाजूला करण्यास बुधवारी दुपारी सुरुवात झाली. मशीनचे वजन जास्त असल्याने रस्त्याच्या मधोमध एक मोठी क्रेन उभी करण्यात आली. या क्रेनमुळे मुंबईहून नवीमुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. चेंबूर ते मानखुर्द हे अंतर केवळ 12 ते 15 मिनिटांचे आहे. मात्र कोंडीमुळे हेच अंतर कापण्यासाठी वाहन चालकांना पाच ते सहा तास लागली.

Machine Collapse
Women reservation bill: महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचे विशेष अधिवेशन; मे महिन्यामध्ये होण्याची शक्यता

अंतर्गत रस्त्यांवरही कोंडी

सायन-पनवेल मार्गावरील कोंडीचा परिणाम अन्य मार्गांवरही झाला. पूर्व द्रुतगती मार्ग, पूर्व मुक्त मार्ग आणि घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यावर देखील बुधवारी रात्री पर्यत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अनेक वाहन चालकांनी या वाहतूक कोंडीतून बाहेर निघण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचा पर्याय निवडला होता. तिथेही वाहतूक तुंबल्याने चेंबूर, गोवंडी, देवनार आणि मानखुर्द येथील रस्ते ठप्प झाले होते.

वाहतूक पोलिसांना मोठा मनस्ताप

बुधवारी संध्याकाळी ऐन कार्यालय सुटण्याच्या वेळीच वाहतूक कोंडी कायम राहिल्याने वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली. बुधवारी चेंबूर, देवनार, मानखुर्द आणि गोवंडी परिसरातील प्रत्येक सिग्नलवर चार ते पाच वाहतूक पोलीस उभे राहून वाहतुकीचे नियोजन करत होते. मात्र परिस्थिती त्यांच्याही हाताबाहेर गेलेली होती. काही वाहन चालक कोंडीतून लवकर बाहेर पडण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याने त्याचा वेगळाच त्रास सहन करावा लागला.

नवी मुंबईला घरी निघालेले संतोष चव्हाण यांचा मृत्यू

सायन-पनवेल मार्गावर मानखूर्दमध्ये उड्डण पुलासाठी पिलरचा खड्डा खोदणारे मशिन कोसळून नेहरूनगर पोलीस ठाण्याचे शिपाई संतोष चव्हाण (47) यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री झालेल्या या घटनेने बंदोबस्तावरील पोलिसही सुन्न झाले. संतोष चव्हाण यांचा या कामाशी तसा संबंध नव्हता. आपल्या दुचाकीवरून ते नवीमुंबईला घरी जात असतानाच या मशिनखाली ते आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news