

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाकडून घेण्यात आलेल्या बीसीएसह अन्य पाच अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकालात पाच विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील चार आणि राजस्थानमधील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.
गेल्या २८ व २९ एप्रिल या कालावधीत बीसीए (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन), बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन), बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज), बीबीएम (बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट) आणि बीएचएमसीटी (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.
यंदा चार सत्रांमध्ये संगणकाधारित (सीबीटी) पद्धतीने घेण्यात आली होती. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १२३ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी ७१ हजार ६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६२ हजार ३०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ३२ हजार ८५१ मुले आणि २९ हजार ४४९ मुली होत्या. जाहीर केलल्या निकालात ठाण्याचा अर्जुन ब्रीद, पुण्याचा वेदांत राजेश इबहाद, सोलापूरची खिलती हेमल शहा, रायगडचा ओजस उदय पोवार आणि राजस्थानातील जयपूरचा निकेत खत्री यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवून सर्वोच्च यश मिळवले आहेत.
निकालात ९० ते ९९.९९ पर्सेंटाईल ६ हजार ४९७ विद्यार्थ्यांनी, तर १०० पर्सेंटाईल मिळविले आहेत. म्हणजेच ९० किंवा त्यापेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ६ हजार ५०२ इतकी आहे. सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश सुरु होणार आहेत. बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि बीएचएमसीटी या व्यावसायिक प्रवेशासाठी नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.
१०० पर्सेंटाईल मिळविणारे विद्यार्थी
अर्जुन ब्रीद ठाणे
वेदांत राजेश इबहाद पुणे
खिलती हेमल शहा सोलापूर
ओजस उदय पोवार रायगड
निकेत खत्री जयपूर राजस्थान
प्रवर्गनिहाय अव्वल विद्यार्थी
खुला प्रवर्ग
अर्जुन ब्रीद (ठाणे) १००
खिलती हेमल शहा (सोलापूर) १००
ओजस उदय पोवार (रायगड) १००
ओबीसी
वेदांत राजेश इबहाद (पुणे) १००
एससी
मुद्रा विजय वाघमारे (मुंबई उपनगर) ९९.८८
एसटी
सुश्रुत जयंत फुलकर (नाशिक) ९९.९७
डीटी/व्हीजे
ओम प्रवीण पाटील (जळगाव) ९९.४८
एनटी-बी
राजेश कपिल गिरी (पुणे) ९८.४९
एनटी-सी
रश्मिता महेंद्र मडके (ठाणे) ९९.८५
एनटी-डी
प्रथमेश सुदाम दौंड (ठाणे) ९९.८८
एसबीसी
अनिका भूषण मुसळे (पुणे) ९९.९३
एसइबीसी
ज्ञानराज दिलीप पवार (नांदेड) ९९.०८