

मुंबई: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस (मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन/मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) प्रवेश परीक्षेच्या पहिल्या संधीचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला.
यंदाच्या निकालात नाशिकचा साहील बाळासाहेब गाजरे, नागपूरचे पार्थ सतीश मालसरिया, नमन अग्रवाल आणि यशोधरा राजे राठोड, मुंबईच्या शशांक चंद्रहास प्रभू तसेच अमरावतीची शुभांगी संदीप ठाकूर या राज्यातील विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल मिळविले.
तर उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा आशय प्रधान आणि उत्तराखंडमधील डेहराडूनचा रुद्र कैनतुरा यांनीही शंभर पर्सेंटाईलची गुण मिळवले आहेत.
एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षा 6 ते 8 एप्रिल या कालावधीत तीन दिवसांत पाच सत्रांमध्ये संगणकाधारित (सीबीटी) पद्धतीने राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमधील 181 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. परीक्षेसाठी एकूण 1 लाख 32 हजार 838 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 16 हजार 196 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांचे गुणपत्रक त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले असून, या अभ्यासक्रमासाठीची केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (कॅप) लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी निकाल पाहताना टक्केवारीऐवजी पर्सेंटाईलचा विचार करावा, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.
प्रवर्गनिहाय सर्वोच्च पर्सेंटाईल मिळवणारे विद्यार्थी
खुला गट
पार्थ सतीश मालसरिया, नागपूर 100%
नमन अग्रवाल, नागपूर 100%
शशांक चंद्रहास प्रभू, मुंबई शहर 100%
शुभांगी संदीप ठाकूर, अमरावती 100%
एससी
मयूर कुशाब उराडे, चंद्रपूर 99.98%
एसटी
दर्शन राजेश धानजकर, परभणी 99.73%
ओबीसी
साहील बाळासाहेब गाजरे, नाशिक 100%
एसबीसी
अनुजा अविनाश भागवत, सातारा 99.96%
एसईबीसी
नितेश नवनाथ कदम, सातारा 99.90%
डीटी/व्हीजे
सिद्धांत प्रदीपसिंग परदेशी, अमरावती 99.99%
एनटी-1
नितीन रवींद्र मोरे,जळगाव 99.90%
एनटी-2
वेदांत बब्रुवहान सोनटक्के,लातूर 99.91%
एनटी-3
आदित्य दिलीप काकड,नाशिक 99.91%
100 % मिळवणारे विद्यार्थी
साहील बाळासाहेब गाजरे, नाशिक
पार्थ सतीश मालसरिया, नागपूर
नमन अग्रवाल, नागपूर
यशोधरा राजे राठोड, नागपूर
शशांक चंद्रहास प्रभू, मुंबई शहर
शुभांगी संदीप ठाकूर, अमरावती
आशय प्रधान गाझियाबाद, उत्तर प्रदेश
रुद्र कैनतुरा डेहराडून, उत्तराखंड