Fishing Ban Violation: मच्छीमारांनी मत्स्यव्यवसाय विभागाचे नियम बसवले धाब्यावर

पावसाळी मासेमारी बंदीचे उल्लंघन, नौकेवर कारवाई
Fishing Ban Violation
Fishing Ban ViolationPudhari
Published on
Updated on

नवी मुंबई: पावसाळी मासेमारी करू नका असे मत्स्यव्यवसाय विभागाकडून सांगितले जाते. मात्र मच्छीमारांकडून सर्रास नियम धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे वाशी खाडीत पावसाळी मासेमारी बंदीचे उल्लंघन करणाऱ्या एका मासेमारी नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली आहे.

स्थानिक मच्छिमारांमार्फेत वाशी खाडीत ट्रॉलर नौका अनधिकृतरित्या मासेमारीसाठी आल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त आयुक्त महेश देवरे, प्रादेशिक उपआयुक्त नागनाथ भादुले यांनी कारवाई केली.

Fishing Ban Violation
Mumbai Tree Cutting: विकासाच्या नावाखाली ५९ झाडांचा बळी; महापालिकेने मागवल्या स्थानिकांकडून हरकती-सूचना

परवाना अधिकारी काळे यांनी वाशी जेट्टी येथील सुरक्षारक्षक यांच्यासह घटनास्थळी पाहणी केली. मात्र, रात्री ओहोटी असल्याने आणि संबंधित नौकेपर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही नौका उपलब्ध नसल्याने रात्रीभर संशयित नौकेवर पाळत ठेवण्यात आली.

त्यानंतर स्थानिक मच्छिमारांची नौका उपलब्ध होताच सुरक्षा रक्षक आणि नवी मुंबई सागरी सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांसह मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली. यावेळी, हृषीकेश खंडू कोळी (रा. नवापाडा, करंजा) यांच्या मालकीची 'आई द्रोणागिरी भोले' या मासेमारी नौकेने पावसाळी मासेमारी बंदीचे उल्लंघन केले.

Fishing Ban Violation
Malad News: समुद्राकडे जाणारा तरंगता कचरा रोखणारा पथदर्शी प्रकल्प मालाड खाडीत सुरू

नौकामालकास नोटीस

दरम्यान, नोटीस नौकामालकास बजावण्यात आली आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत ही नौका वाशी ब्रिज जेट्टी बंदरात थांबवण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली. तसेच याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news