FDA action on methanol : मिथेनॉल विक्रेत्यांविरोधात 'एफडीए' अॅक्शन मोडवर

पुणे विषारी मद्यप्रकरणानंतर राज्यभर विशेष मोहीम; १५ दिवसांत ९३७ परवानाधारकांची तपासणी
FDA action on methanol
मिथेनॉल विक्रेत्यांविरोधात 'एफडीए' अॅक्शन मोडवरpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : पुण्यातील विषारी मद्यसेवन प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) अॅक्शन मोडमध्ये आले असून राज्यभर मिथेनॉल आणि इतर विषारी द्रव्यांच्या विक्री परवानाधारकांची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांत राज्यातील ९३७ परवानाधारक आस्थापनांची सखोल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एफडीएच्या माहितीनुसार, या मोहिमेंतर्गत आतापर्यंत २२६ आस्थापनांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीदरम्यान परवान्याच्या अटींचे पालन, साठा व्यवस्थापन, वितरण साखळी तसेच विक्री प्रक्रियेची बारकाईने पडताळणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

FDA action on methanol
Parbhani News : परभणीत एफडीएची मोठी कारवाई; ३.४७ लाखांचा नियमबाह्य अन्नसाठा जप्त

मिथेनॉलसारख्या विषारी द्रव्यांचा गैरवापर रोखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० तसेच महाराष्ट्र विषारी द्रव्य नियम, १९७२ अंतर्गत असलेल्या तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. परवानाधारकांनी सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

FDA action on methanol
Nashik news | खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर मोठी कारवाई; मंत्री नरहरी झिरवाळ

तपासण्या सुरू राहणार

जनतेच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे सांगत प्रशासनाने तपासणी मोहीम आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. राज्यभर औषध निरीक्षकांमार्फत नियमित तपासण्या सुरू राहणार असून मिथेनॉलच्या खरेदी-विक्रीवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news