FDA Action Against Blood Centers: जे. जे.सह तीन रक्तकेंद्रांचे परवाने रद्द; गंभीर नियमभंगावर एफडीएचा दणका

मुंबईतील माया ब्लड सेंटर आणि सर जे. जे. महानगर रक्तकेंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून पुण्यातील आर. जी. घोलप मेमोरियल ब्लड सेंटरचाही परवाना रद्द करण्यात आला आहे.
Blood Bank
Blood Bankpudhari photo
Published on
Updated on

मुंबई: रक्तदाता आणि रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने गंभीर नियमभंग करणाऱ्या तीन रक्तकेंद्रांवर कठोर कारवाई केली आहे. मुंबईतील माया ब्लड सेंटर आणि सर जे. जे. महानगर रक्तकेंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून पुण्यातील आर. जी. घोलप मेमोरियल ब्लड सेंटरचाही परवाना रद्द करण्यात आला आहे.

Blood Bank
Food Safety Inspection: मंत्रालय आणि विधान भवनातील कँटीनवर एफडीएची धडक कारवाई; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रत्यक्ष पाहणी

विशेष तपासणीत पायाभूत सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ, उपकरणांची देखभाल, रक्तसाठवण, दस्तऐवजीकरण आणि वैधानिक नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.

Blood Bank
Unused Acquired Land Review: रखडलेल्या प्रकल्पांच्या जमिनी सरकारजमा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

महाराष्ट्रात सध्या ४१३ परवानाधारक रक्तकेंद्रे आणि ४६८ रक्तसाठवणूक केंद्रांवर एफडीएकडून नियमित तसेच आकस्मिक तपासण्या केल्या जातात. एफडीएने स्पष्ट केले की, रक्तसुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तकेंद्रांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news