FDA Cosmetics Raid: दीड कोटींंची बेकायदा सौंदर्यप्रसाधने जप्‍त; एफडीएची मोठी कारवाई

भिवंडीतील विनापरवाना कारखाना केला सील
FDA Cosmetics Raid
FDA Cosmetics RaidPudhari
Published on
Updated on

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने मुंबई आणि भिवंडी येथे बेकायदा व दिशाभूल करणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ५२ लाख ९७ हजार ८३२ रुपयांचा साठा आणि उत्पादन यंत्रसामग्री जप्त केली आहे. तसेच भिवंडीतील विनापरवाना उत्पादन करणारा कारखाना सील करण्यात आला.

अंधेरी पूर्व येथील मेसर्स दिया इंटरप्रायझेस येथे छापा टाकून सुमारे २९.३४ लाखांचा सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला. तपासणीत मुलांसाठी व पुरुषांसाठी विक्रीस ठेवलेल्या उत्पादनांवर अस्तित्वात नसलेल्या उत्पादक संस्थेचा पत्ता, तसेच बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक आणि मुदतबाह्य दिनांक नमूद नसल्याचे आढळले.

FDA Cosmetics Raid
School Uniform Quality Check: गणवेशांच्या गुणवत्तेची राज्यभर तपासणी! निकृष्ट दर्जाच्या गणवेश पुरवठादारांवर कारवाईचा इशारा

त्यामुळे ही उत्पादने दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट झाले. दुसरी कारवाई भिवंडीतील सिग्मा लाइफस्टाइल प्रा. लि. या कंपनीवर करण्यात आली. संबंधित संस्थेकडे सौंदर्यप्रसाधन उत्पादनासाठी आवश्यक परवाना नसतानाही उत्पादन सुरू असल्याचे आढळून आले. उत्पादनांवर ‘सल्फेट-फ्री आणि ’पॅराबेन-फ्री असे दावे छापून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप एफडीएने केला आहे.

FDA Cosmetics Raid
Mumbai Drain Cleaning: कुर्ल्यात दारूडे, गर्दुल्ल्यांकडून नालेसफाई; सफाई कामावर प्रश्नचिन्ह

या कारवाईत उत्पादन यंत्रसामग्रीसह कच्चा व तयार माल जप्त करण्यात आला असून त्याची किंमत १.२३ कोटी रुपये आहे. यानंतर कारखाना सील करण्यात आला. या प्रकरणी संबंधित जबाबदार व्यक्तींविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर विनापरवाना व भ्रामक सौंदर्यप्रसाधनांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे.

ग्राहकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य विनापरवाना व भ्रामक सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादन आणि विक्रीविरुद्ध राज्यव्यापी विशेष मोहीम राबवत आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा ऑनलाईन विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल.

- तुकाराम मुंढे आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

logo
Pudhari News
pudhari.news