Auto taxi drivers Marathi rule : रिक्षा, टॅक्सी चालकांसाठीची मराठी सक्ती लांबणीवर

एक वर्षाची मुदतवाढ देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
Auto taxi drivers Marathi rule
Auto taxi drivers Marathi rulePudhari
Published on
Updated on

मुंबई : जुजबी मराठी शिकण्यासाठी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली आणि मुंबईसह राज्यभरातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा दिला.

या चालकांना मराठीचे जुजबी ज्ञान असणे परिवहन विभागाने बंधनकारक केले होते. त्यासाठी तपासणी मोहीम सुरू करून ज्या चालकांना मराठीचे ज्ञान नाही अशांना नोटिसा जारी केल्या. यानंतरही मराठी आले नाही तर कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला होता. सरनाईक हे मराठी सक्तीवर ठाम असताना त्यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला.

Auto taxi drivers Marathi rule
DJ Noise Pollution Latur : ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील ४ मंडळे कारवाईच्या रडारवर

अमराठी टॅक्सी आणि रिक्षा चालकांची संघटना आम्हाला भेटली. आम्हाला वेळ वाढवून द्या. आम्हाला इतक्या तातडीने मराठी भाषा शिकणे शक्य नाही, असे त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार मराठी शिकण्यासाठी या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

या रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर करतानाच या वर्षभरात कुठलीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. मराठी शिकण्यासाठी आम्हाला वेळ वाढवून द्या, अशी मागणी करत रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी फडणवीस यांना भेटले होते. या भेटीनंतर फडणवीस यांनी निर्णय जाहीर केला.

Auto taxi drivers Marathi rule
Kopargaon Stray Cattle: कोपरगावात मोकाट जनावरांचा प्रश्न पेटला; वकिलांकडून पालिकेला कायदेशीर नोटीस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news