

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी (दि.२०) सकाळी ७.०० वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई दक्षिण मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ४४.२२ टक्के मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यात पीयूष गोयल, कपिल पाटील, भारती पवार या तीन केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील माजी मंत्री वर्षा गायकवाड, श्रीकांत शिंदे, ठाकरे गट शिवसेनेचे खासदार राजन विचारे, अरविंद सावंत अशा दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात राहिलेल्या १३ मतदारसंघांत मतदान होईल तसेच हा टप्पा पूर्ण होईल. पुढील दोन टप्प्यांत अन्य राज्यातील ११४ मतदारसंघात निवडणूक होणार आहे. त्यानंतर ४ जूनला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राज्यात मतदान झाल्यानंतर पुढचे दोन आठवडे निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या टप्प्यात मुंबईतील सहा, ठाणे जिल्ह्यातील तीन, नाशिकमधील दोन मतदारसंघांसह पालघर व धुळे मतदारसंघात मतदान होणार आहे. २०१९ मध्ये या सर्व जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या होत्या. पण राज्यातील राजकीय उलथापालथीमुळे यावेळी सर्वच मतदारसंघांत अत्यंत चुरशीची निवडणूक पार पडत आहे.
हेही वाचा :