Promod Navalkar Viewing Gallery : 'नवलकर व्ह्यूइंग गॅलरी'लाही आता प्रवेश शुल्क

महानगरपालिकेचा निर्णय; १६ वर्षांपर्यतच्या मुलांना शुल्कातून वगळले
Money
MoneyPudhari
Published on
Updated on

मुंबई : मलबार टेकडी येथील 'प्रमोद नवलकर व्ह्यूइंग गॅलरी'च्या प्रवेशाकरिता शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव महापौरांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत सादर करण्यात आला. त्यामुळे पर्यटकांना आता शुल्क देऊन, प्रवेश मिळवावा लागणार आहे.

मरीन ड्राइव्ह क्विन नेकलेस व गिरगाव चौपाटीचा देखावा कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक मलबार हिल टेकडीवर असलेल्या नाझ या हॉटेलला भेट देत होते. हॉटेलवरुन दिसणारा मरीन ड्राइव्ह क्विन नेकलेस व गिरगाव चौपाटीचा देखावा अवर्णनिय असा असा असल्यामुळे देशी-विदेशी पर्यटकांना अक्षरश: भुरळ पडली होती.

Money
Maharashtra Tourism Policy: पर्यटन धोरण कागदावरच? रायगडसह राज्यातील पर्यटनस्थळांवर सुविधांचा अभाव

परंतु नाझ हटिलचा भाडे करार १९९९ मध्ये संपुष्टात आल्यावर मुंबई महापालिकेने ही वास्तु आपल्या ताब्यात घेऊन त्याठिकाणी मलबार हिल नियंत्रण कक्ष स्थापन केला. परंतु वास्तु अत्यंत जुनी असल्याने व ती मोडकळीस आली होती. या वास्तूची दुरूस्ती व पुनर्बाधणी करून त्यावरील खुल्या जागेचा दर्शनीय मनोरा (मुंबई व्यूविंग गॅलेरी) बांधली. या गॅलरीला भ्रमंतीकार प्रमोद नवलकर यांचे नाव देण्यात आले.

या गॅलरीच्या उभारणीसाठी दहा कोटी खर्च झाला असून गॅलरीच्या मेंटेनन्ससाठीही लाखो रुपये खर्च आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या गॅलरीला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यात सोळा वर्षावरील पर्यटकांसाठी २० रुपये तर परदेशी पर्यटकांसाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

प्रस्तावाला सर्वपक्षीय गट नेत्यांच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर स्थायी समितीमध्ये रीतसर प्रस्ताव आणून शुल्क आकारण्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या वास्तूच्या सर्वात वरच्या मजल्यावर दुर्बिणी लावलेल्या आहेत. त्यामुळे गिरगाव चौपाटी, मरीन ड्राईव्ह, एयर इंडिया इमारत, राजाबाई टॉवर, या इमारत अगदी जवळून पाहण्याचा अनुभव पर्यटकांना मिळत आहे.

Money
Maharashtra Hotel Policy: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठी खुशखबर! स्टार रेटिंगची सक्ती रद्द

५४ मीटर उंच व्ह्यूविंग गॅलेरी

दक्षिण मुंबईमधील सर्वात उंच ठिकाणी वसलेले गॅलरी असून त्याची समुद्र सपाटीपासुनची उंची ५४ मीटर आहे. या वास्तुचे चार मजले असून, पहिल्या मजल्यावर मलबार हिल नियंत्रण कक्ष, दूसऱ्या मजल्यावर मनोरा, तिसऱ्या मजल्यावर दुर्बिणीतून पाहण्यासाठी मनोरा उभारला आहे. व्हयूविंग गॅलेरी येथून गिरगाव चौपाटी, मरीन ड्राईव्ह व अरबी समुद्राचे निसर्गरम्य सौंदर्य अनुभवता येते. सदर वास्तूच्या सर्वात वरच्या मजल्यावर दुर्बिणी लावलेल्या आहेत. त्यामुळे गिरगाव चौपाटी, मरीन ड्राईव्ह, एयर इंडिया इमारत, राजाबाई टॉवर, या इमारत अगदी जवळून पाहण्याचा अनुभव पर्यटकांना मिळत आहे.

असे असेल शुल्क

  • भारतीय पर्यटक (१६ वर्षावरील) - २० रुपये

  • परदेशी पर्यटक (१६ वर्षावरील) - ५० रुपये

  • ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक - नि:शुल्क

  • दिव्यांग व शालेय विद्यार्थी - नि:शुल्क

  • १६ वर्षाखालील मुले - नि:शुल्क

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news