Engineering Admissions Seats |अभियांत्रिकीच्या यंदा २ लाख १६ हजार जागा

गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे १३ हजार जागांची वाढ, संगणक अभियांत्रिकीला सर्वाधिक ३० हजार ९९३ जागा
Engineering College
Engineering College
Published on
Updated on

मुंबईः राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत यंदा विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षसाठी उपलब्ध असलेल्या २ लाख १६ हजार ५५२ जागांसाठी तब्बल २ लाख ४४ हजार ३५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. म्हणजेच उपलब्ध जागांच्या तुलनेत सुमारे २८ हजार अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या शर्यतीत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अभियांत्रिकीच्या सुमारे १३ हजार ६६९ जागांची वाढ करण्यात आली असूनही प्रवेशासाठीची स्पर्धा कायम असल्याचे चित्र आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षामार्फत राज्यातील ३८० अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील १११ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राज्यात २ लाख २ हजार ८८३ जागा उपलब्ध होत्या. यंदा त्यात वाढ होऊन एकूण जागा २ लाख १६ हजार ५५२ इतक्या झाल्या आहेत. वाढीव जागा उपलब्ध करूनही नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने गुणवत्तेनुसार महाविद्यालय आणि पसंतीची शाखा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस राहणार आहे.

पहिल्या प्रवेश फेरीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण जागांपैकी सर्वसाधारण आणि आरक्षण प्रवर्गासाठी १ लाख ९२ हजार ३० जागा आहेत. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) १५ हजार ७३४, तर शिक्षण शुल्क माफी योजनेअंतर्गत (टीएफडब्ल्यूएस) ८ हजार ७८८ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुणवत्ता क्रमांक, आरक्षण प्रवर्ग आणि शाखानिहाय जागांचा विचार करून पसंतीक्रम निश्चित करण्याची गरज आहे.

Engineering College
CJP Protest Political Boost | 'सीजेपी'च्या आंदोलनातून ठाकरे गटाला संजीवनी

अभियांत्रिकी प्रवेशासाठी २ जुलैपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली होती. १९ जुलैपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानंतर २२ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी, तर २७ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी आणि जागांचा तपशील जाहीर करण्यात आला. पहिल्या फेरीसाठी २८ ते ३० जुलैदरम्यान ऑनलाइन पसंतीक्रम भरता येणार असून, २ ऑगस्टला पहिल्या फेरीतील जागावाटप जाहीर होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३ ते ५ ऑगस्टदरम्यान संबंधित संस्थेत कागदपत्रे व शुल्क सादर करून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

शाखानिहाय उपलब्ध जागांमध्ये यंदाही संगणक क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांचे वर्चस्व कायम आहे. संगणक अभियांत्रिकीसाठी नियमित आणि ईडब्ल्यूएस मिळून ३० हजार ९९३ जागा उपलब्ध आहेत.

Engineering College
सरकारी, मंत्र्यांच्या आस्थापनांवर किती धाडी टाकल्या? : हायकोर्ट

त्याखालोखाल मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, संगणक विज्ञान व अभियांत्रिकी या पारंपरिक शाखांबरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रमांनाही मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या बदलत्या गरजांनुसार विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news