मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा, नव्या सरकारच्या स्थापनेच्या घडामोडींना वेग

Eknath Shinde resigns | नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार पाहणार
Eknath Shinde resigns
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सादर केला.(Pudhari Photo)
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज मंगळवारी (दि. २६ नोव्हेंबर) राज्य विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde resigns) यांनी आज आपल्या पदाचा आणि ओघानेच सरकारचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सादर केला. त्याचवेळी नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत राज्यपाल शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार पाहण्यास सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde) यांनी आज सकाळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, राजभवनावरील ही औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक होणार असल्याचे समजते.

शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री

दरम्यान, भाजप नेते राहुल नार्वेकर यांनी आज सकाळी बोलताना म्हटले होते की,"...आज विधानसभेची मुदत संपत आहे. त्यांनी (मुख्यमंत्री शिंदे) आज राजीनामा दिल्यास, त्यांना नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार पाहण्याची विनंती केली जाईल. तिन्ही पक्षाचे नेते, आमचे संसदीय मंडळ मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील आणि लवकरच महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल.''

सत्तेचा फॉर्म्युला आज ठरणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मंगळवारी मुंबईत येत असून, तिन्ही पक्षांच्या बैठकीनंतर आज सायंकाळपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होऊ शकते. अमित शहा, राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त बैठक होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी संध्याकाळी दिल्लीत दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची फोनवर चर्चा झाली. आता मंगळवारी मुंबईतच अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

अमित शहा आज मुंबईत येणार

अमित शहा मुंबईत येत असल्याने शिंदे यांनी आपल्या सर्व भेटी व कार्यक्रम रद्द केले आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांनी दिल्लीला जाणेही टाळले आहे. दरम्यान, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री फडणवीस हे अमित शहा यांच्याशी चर्चा न करताच मुंबईला परतले असल्याचे सोमवारी रात्री सांगण्यात आले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार फडणवीस रात्री उशिरा अमित शहा यांच्याशी चर्चा करणार होते. मात्र, अचानक त्यात बदल झाला. स्वतः अमित शहा यांनी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला.

Eknath Shinde resigns
विधानसभेलाही 'तुतारी'ला 'पिपाणी'चा फटका, ९ मतदारसंघांत पराभव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news