

मुंबई : चंदन शिरवाळे
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हासमोर अपक्ष उमेदवारांना दिलेल्या पिपाणी या निवडणूक चिन्हाचा फटका बसला आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे-पाटील निवडून आले आहेत. आंबेगाव मतदारसंघात वळसे-पाटील यांनी १ हजार ५२३ मतांनी शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यावर मात केली. त्याचवेळी पिपाणी चिन्ह घेऊन निवडणूक लढवत असलेल्या देवदत्त शिवाजी निकम या भारतीय धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवाराने २ हजार ९६५ मते घेतली. या मतांचा फटका शरद पवार यांच्या देवदत्त निकम यांना बसला.
१ अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांचा ट्रम्पेट चिन्हामुळे निसटता विजय. ट्रम्पेट चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवार देवदत्त निकम यांनी २९६५ मते घेतली.
२ नगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार आणि खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनाही ट्रम्पेट चिन्हाचा फटका बसला. अजित पवार गटाचे काशिनाथ दाते यांनी राणी लंकेंचा अवघ्या १५२६ मतांनी पराभव केला. येथे ट्रम्पेट चिन्हावरील अपक्ष उमेदवार सखाराम मालु सरक यांनी ३५८२ मते घेतली.
३ बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघात भाजपच्या नमिता मुंदडा यांनी शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा २६८७ मतांनी पराभव केला. या मतदारसंघातही ट्रम्पेट चिन्ह असलेले अपक्ष उमेदवार अशोक थोरात यांनी ३५५९ मते घेतली.
३ नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदारसंघात भाजपचे भीमराव केराम यांनी शरद पवार गटाचे प्रदीप नाईक यांचा ५६३६ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हावर उभे असलेले अपक्ष उमेदवार अशोक ढोले यांनी ५३११ मते घेतली, तर वंचितच्या उमेदवाराने ४५१५ मते घेतली.
४ जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी शरद पवार गटाचे विजय भांबळे यांचा ४५१६ मतांनी पराभव केला. ट्रॅम्पेट चिन्हावरील अपक्ष उमेदवार विनोद भवाळे यांनी ७४३० मते घेतली. या मतदारसंघात वंचितचे उमेदवार सुरेश नागरे यांनी तब्बल ५६४७४ मते घेतली.
५ जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघात माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांचा अवघ्या २३०९ मतांनी पराभव झाला. शिंदे सेनेचे हिकमत उढाण विजयी झाले. या मतदारंसघात ट्रम्पेट चिन्हावरील अपक्ष उमेदवार बाबासाहेब शेळकेंनी ४८३० मते घेतल्याने टोपेंना त्याचा फटका बसला.
६ संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघात भाजपचे प्रशांत बंब यांनी शरद पवार गटाचे सतीश चव्हाण यांचा ५०१५ मतांनी पराभव केला. ट्रम्पेट चिन्हावरील अपक्ष उमेदवाराने ३४६७ मते घेतली, तर वंचितच्या उमेदवाराने ८८३९ मते घेतली, याचा फटका चव्हाण यांना बसला.
७ शहापूर मतदारसंघात अजित पवार गटाचे दौलत दरोडा यांनी शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा यांचा केवळ १६७२ मतांनी पराभव केला. ट्रम्पेट चिन्हावरील अपक्ष उमेदवार रमा बाळू शेंडे उर्फ रुपाली रविकांत आरज यांनी ३८९२ मते घेतली.
८ अणुशक्तीनगर मतदारसंघात अजित पवार गटाच्या सना मलिक यांनी शरद पवार गटाचे फाहद अहमद यांचा ३३७८ मतांनी पराभव केला. ट्रम्पेट चिन्हावरील अपक्ष उमेदवार जयप्रकाश अग्रवाल यांना ४०७५ मते मिळाली.
९ - अकोले मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांचा अजित पवार गटाचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी ५५५६ मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांनी तब्बल ३२७८३ मते घेतली. अमित भांगरे यांचा ५५५६ मतांनी पराभव झाला.
१० - शेवगाव मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे यांनी शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापराव ढाकणे यांचा १९०४३ मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांनी ४१७८७ मते घेतली.
११ - माजलगाव मतदारसंघात अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके यांनी शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप यांचा ५८९९ मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार रमेश अडसकर यांनी ३८९८१ मते घेतली, तर प्रकाश सोळंके यांचा ५८९९ मतांनी पराभव झाला.