Gulabrao Patil: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील; गुलाबराव पाटलांचा दावा

गोरेगाव येथील शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा केला उल्लेख
Gulabrao Patil
Gulabrao PatilPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागील विधानसभा निवडणूक लढवण्यात आली असता, महायुतीचे २३२ आमदार निवडून आले. आता शिवसेनेच्या सर्व आमदारांनी ताकद लावल्यास पुढील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील, असा दावा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

गोरेगाव येथे आयोजित केलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. या दोन्ही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करताच, उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

आपल्या खास शैलीतून कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ दिले नसते.

इतकेच नाही तर त्यांनी उद्धव यांना काँग्रेस सोबतही जाऊ दिले नसते. आता हेच उद्धव ठाकरे आमची शिवसेना खरी असल्याचा दावा करत आहेत.

Gulabrao Patil
Ramdas Kadam: जरांगे यांच्या संपत्तीची चौकशी करा; रामदास कदम यांची मागणी

पण त्यांच्या मागे कोणीही नाही. शोले चित्रपटातील असरानीप्रमाणे 'आधे इधर आधे उधर' अशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झाली आहे. शिवसेनेच्या या अवस्थेला संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोपही कदम यांनी केला.

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही एकनाथ शिंदे हे भावी मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, ज्याप्रमाणे राम सेतू तयार झाला त्याप्रमाणे आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी लोकांना जोडले. आई तुळजा भवानीदेवीच्या चरणी माझे मागणे आहे की आमच्या शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री व्हावं आणि शेतकरी सुखी व्हावे.

मी पुढच्यावेळी येथे भाषण करायला येईल, त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील. शिंदे यांना जो आडवा येईल त्याचे कदापी चांगले होणार नाही, असा दावाही पाटील यांनी केला.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाटील म्हणाले, भगवा आमच्या खांद्यावर आणि शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधावर हे व्यासपीठावरील वाक्य आपल्याला फार आवडले. पण शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी अविरत कष्ट घेणारे शिंदे यांच्यावर काही लोक भ्रष्टाचाराचे आरोप करू लागले आहेत. पण त्याकडे आपण सर्वांनी दुर्लक्ष केले पाहिजे. सध्या आपल्यापुढे दुष्काळ महत्त्वाचा आहे.

Gulabrao Patil
Sagar Naik Controversy: कोर्टाची बनावट ऑर्डर पाठवून कारवाई रोखली; सागर नाईक यांची नगरविकासकडून चौकशी

माझी सर्व आमदार आणि खासदारांना विनंती आहे की, यंदाचा दुष्काळाकडे संधी म्हणून पहा. पन्नास टक्के पैसे जलसंधारणावर खर्च करा. नाले खोलीकरण केल्यास त्याचा भविष्यात फायदा होईल. तसेच पुढील निवडणुकीत प्रत्येक आमदाराने शेजारच्या मतदार संघातून एक आमदार निवडून आणल्यास पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

निवृत्त न्यायाधीश श्रीहरी डावरे यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. ते म्हणाले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या कायद्याची मी ३३ वर्षे सेवा केली आहे. फक्त न्यायदान हाच माझा धर्म होता.

आता शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हिंदुत्ववादी शिवसेनेला योगदान द्यावे, म्हणून मी हा पक्षप्रवेश केला आहे. हिंदुत्वाचा सन्मान करण्यासाठी हाती भगवा घेतला आहे, अशी भावना डावरे यांनी व्यक्त केली.

गुलाबराव पाटील म्हणाले

  • पुढच्या वेळेस मी ज्यावेळी भाषण करण्यास येईल त्‍यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील.

  • येत्‍या निवडणुकीत प्रत्येक आमदाराने शेजारच्या मतदार संघातून एक आमदार निवडून आणल्यास पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील.

  • दुष्काळाकडे संधी म्हणून पहा. पन्नास टक्के पैसे जलसंधारणावर खर्च करा. नाले खोलीकरण केल्यास त्याचा भविष्यात फायदा होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news