Bhayandar Crime News: भाईंदर हादरले! अल्पवयीन मुलीची विक्री करून शोषण

गरिबीचा सौदा; तक्रारदारासह आठजण अटकेत
Bhayandar Crime News
Bhayandar Crime NewsPudhari
Published on
Updated on

मिरा रोड: मानवतेला काळिमा फासणारी आणि समाजमन सुन्न करणारी एक संतापजनक घटना भाईंदरमध्ये उघडकीस आली आहे. चांगल्या शाळेत शिक्षण देण्याचे आणि काळजी घेण्याचे आमिष दाखवून हरियाणातील एका गरीब अल्पवयीन मुलीला भाईंदर येथे आणण्यात आले. त्यानंतर तिची खरेदी-विक्री करत विविध व्यक्तींकडून लैंगिक शोषण करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

विशेष म्हणजे, स्वतःला फिर्यादी म्हणून सादर करणारा संजय देवनारायण गुप्ता हाच या घृणास्पद रॅकेटचा सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याच्यासह एकूण आठ जणांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे.

Bhayandar Crime News
Women Startup Hub| महिला उद्योजकतेला प्रोत्साहन, स्टार्ट अप हबची स्थापना: मुख्यमंत्री फडणवीस

भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाण्यात ३ मार्च २०२६ रोजी (होळीच्या दिवशी) संजय देवनारायण गुप्ता (वय ५४, व्यवसाय - सिक्युरिटी गार्ड) याने आपल्या आश्रयाखाली असलेल्या मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीनंतर नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहाय्यक पोलीस निरीक्षक राम सुरवसे यांनी तपास सुरू केला. मुलीचा शोध घेतला असता ती भाईंदर पूर्वेतील नवघर रोड परिसरातून सापडली. पीडित मुलीने सांगितलेल्या माहितीने पोलिसही हादरून गेले.

संजय गुप्ता हा माझा नातेवाईक नसून, माझ्या कुटुंबाच्या गरिबीचा फायदा घेत त्याने मला चांगल्या शिक्षणाचे आमिष दाखवून हरियाणातील अंबाला येथून भाईंदरला आणले, असे तिने स्पष्ट केले.

पोलिस तपासात आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून पीडित मुलीची खरेदी-विक्री केल्याचे आणि विविध व्यक्तींच्या माध्यमातून तिचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले. या गंभीर प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी थेट तक्रारदार संजय गुप्ता आणि त्याची पत्नी मधू संजय गुप्ता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

Bhayandar Crime News
BMC Dialysis Centers: मुंबई महापालिकेची पाच डायलिसिस सेंटर्स खासगी संस्थांकडे

यानंतर झालेल्या चौकशीत या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींची नावे समोर आली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राम सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक संपत आहेर, आदक, सहाय्यक पोलीस फौजदार जितेंद्र पाटील, पोलीस हवालदार संतोष पाटील, भूषण पाटील, सतिश बोराडे, पोलीस अंमलदार नवनाथ पवार आणि महिला पोलीस अंमलदार आरती घोटेकर यांच्या पथकाने केला असून पुढील तपास सुरू आहे.

अटक आरोपी

पोलिसांनी कारवाई करत संजय देवनारायण गुप्ता (कथित फिर्यादी), मधू संजय गुप्ता, सिमा वर्मा, सुनील शर्मा, राकेश मारवाडी उर्फ राकेश रोटांगण, सविलयप्रसाद श्रीवास्तव उर्फ एलआयसीवाला, कुत्तबुद्दीन अब्दुल हमीद खान उर्फ राजू आणि रामचंद्र मारुती भोईर यांना अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news