BMC Dialysis Centers: मुंबई महापालिकेची पाच डायलिसिस सेंटर्स खासगी संस्थांकडे

मुंबई महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये स्वखर्चातून डायलिसिस सेंटर न चालवता ही सेंटर खासगी संस्थांच्या मार्फत चालवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
Dialysis
DialysisPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्येही खासगी संस्थांचा शिरकाव झाला असून हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सेंटर सुरू करण्याची परवानगी या संस्थांना देण्यात आली आहे. त्यानुसार अल्प दरात हॉस्पिटलमधील जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून ही जागा ३० वर्षासाठी देण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये स्वखर्चातून डायलिसिस सेंटर न चालवता ही सेंटर खासगी संस्थांच्या मार्फत चालवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात बोरिवली पूर्व येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, श्री हरिलाल भगवती हॉस्पिटल, मुलुंड येथील एम. टी. अगरवाल, कांदिवली पश्चिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलमध्ये ही सेंटर उभारण्यात येणार आहेत. खासगी भागीदारीतून चालवण्यात येणाऱ्या सेंटरमुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या व या हॉस्पिटलवर अवलंबून असणाऱ्या गोरगरीब रुग्णांची मोठी गैरसोय होणार आहे.

Dialysis
BMC Climate Budget: मुंबई पालिकेचे २०,७३० कोटींचे ‘क्लायमेट बजेट’

ही डायलिसिस सेंटर चालवण्यासाठी ऐपेक्स किडनी केअर संस्था भाडे मोजणार असल्यामुळे या सेंटरमध्ये दाम दुप्पट भाडे घेऊन अन्य रुग्णांवरही डायलिसिस करण्यात येणार आहे. त्यामुळे या सेंटरमध्ये सामान्य रुग्णांचे तातडीने डायलिसिस होणे अशक्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान या प्रस्तावाला शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेसने विरोध केला आहे. मात्र हा प्रस्ताव सुधार समितीमध्ये सत्ताधारी भाजपा शिवसेनेने बहुमताच्या जोरावर मंजूर केला. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यासाठी तो मुंबई महापालिका सभागृहामध्ये सादर करण्यात आला आहे.

Dialysis
Airport Roof Leak: किंचित पावसाने नवी मुंबई विमानतळाला लागली गळती
  • फुले हॉस्पिटलला ७४.३२ चौरस मीटर जागा देण्यात येणार असून प्रतिवर्ष ४ लाख २० हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.

  • भगवती हॉस्पिटलसाठी ३१७.२० चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी वार्षिक १२ लाख रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.

  • अगरवाल हॉस्पिटलमध्ये २११.२१ चौरस मीटर इतकी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी वार्षिक ७ लाख २० हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.

  • शताब्दी हॉस्पिटलमध्ये ९१.९० चौ. मी. जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून वार्षिक ४ लाख २० हजार रु. भाडे आहे.

  • राजावाडी हॉस्पिटलमध्ये ८२.३० चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून भाडे ४ लाख २० हजार रुपये घेण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news