Mumbai Crime : ड्रग्ज तस्करीचा पैसा हवालामार्गे परदेशात

ईडीचे मुंबईसह गुजरातमध्ये ११ ठिकाणी छापे
drug
drugFile Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशांची अफरातफर केल्याच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई आणि गुजरातमधील सुमारे ११ ठिकाणी छापे टाकले. तुरुंगात असलेल्या नवीन चिचकर याच्या कथित आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी टोळीशी संबंधित या प्रकरणात आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात येत आहे.

ईडीच्या तपासानुसार, कोकेन, हायड्रोपोनिक गांजा, एलएसडी आणि गांजापासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीतून या टोळीने गुन्ह्यातील पैसा मिळवल्याचा संशय आहे. हा पैसा हवालामार्गे तसेच क्रिप्टोकरन्सीद्वारे परदेशात पाठवून त्याचा मूळ स्रोत लपवण्याचा प्रयत्न झाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.

drug
Medical Admission 2026 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील जागा भरल्या

या कारवाईदरम्यान ईडीने संशयास्पद आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि अन्य पुरावे जप्त केले आहेत. अमली पदार्थांच्या विक्रीतून मिळालेला पैसा कुठे गुंतवण्यात आला, त्याची विविध माध्यमांतून कशा प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली आणि या व्यवहारांत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.

एनसीबी मुंबई विभाग, मुंबई पोलिसांचे अमली पदार्थविरोधी पथक आणि नवी मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू केला. नवीन चिचकर याला मलेशियातून भारतात आणण्यात आले होते. या कथित आंतरराष्ट्रीय तस्करी जाळ्यातील आर्थिक व्यवहार आणि परदेशातील संपर्कांचीही चौकशी केली जात आहे.

drug
Tiger Shroff Firing Case : टायगर गोळीबारातील अमनला सोनीपतमधून अटक

२०० कोटींच्या अमली पदार्थांच्या साठ्याचे प्रकरण

अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) जानेवारी २०२५ मध्ये केलेल्या मोठ्या कारवाईचा या प्रकरणाचा संबंध आहे. नवी मुंबईतील एका सदनिकेतून सुमारे २०० कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यामध्ये ११.५४ किलो कोकेन, ४.९ किलो हायड्रोपोनिक गांजा आणि ५.५ किलो गांजापासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.