Money Laundering Case: हॉटेल रंगशारदावर ईडीची टाच; प्रभादेवीतील भूखंडासह ३३२.२४ कोटींची मालमत्ता जप्त

ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ अंतर्गत ही कारवाई केली आहे.
Money Laundering Case
Money Laundering CasePudhari
Published on
Updated on

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुंबईतील प्रतिष्ठित रंगशारदा हॉटेल आणि प्रभादेवी येथील भूखंडासह ३३२.२४ कोटींच्या दोन स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई प्रभुदास विरचंद लोटिया आणि रंग शारदा हॉटेल्स प्रा. लि. यांच्याविरोधातील तपासाचा भाग असल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ अंतर्गत ही कारवाई केली आहे. तपासानुसार, म्हाडाने मराठी नाट्य, साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलतीच्या दरात दिलेल्या भूखंडाचा तक्रारीनुसार व्यावसायिक वापर करण्यात आला.

Money Laundering Case
Abu Salem Case: अबू सालेमचा आणखी १८ वर्षे कारागृहात मुक्काम?

या गैरव्यवहारातून मिळालेली रक्कम 'गुन्ह्यातून मिळालेले उत्पन्न' असल्याचा ईडीचा दावा आहे. या तपासाची सुरुवात बांद्रा पोलिसांनी नोंदविलेल्या एफआयआरवरून झाली. रंग शारदा प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी प्रभुदास लोटिया आणि रंग शारदा हॉटेल्स प्रा. लि. यांच्याविरोधात फसवणूक आणि विश्वासघाताचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर इडीने मनी लॉन्ड्रिंगचा स्वतंत्र तपास सुरू केला. तपासात संबंधित भूखंडाच्या वाटपाच्या अटींचे उल्लंघन करून तेथील मालमत्तेचा व्यावसायिक वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे सरकारी सवलतीत मिळालेल्या जमिनीचा मूळ उद्देश बाजूला पडल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.

या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेतल्यानंतर रंगशारदा हॉटेल आणि प्रभादेवीतील भूखंड तात्पुरते जप्त करण्यात आले. आणखी मालमत्ता किंवा आर्थिक व्यवहार तपासाच्या कक्षेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Money Laundering Case
Borivali National Park: नॅशनल पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे हाल; कान्हेरीसाठी दोन किलोमीटरपर्यंत करावी लागतेय पायपीट

मुंबईतील सांस्कृतिक क्षेत्रात रंगशारदा नाट्यगृह हे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. अनेक दशकांपासून येथे मराठी नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम आणि साहित्यिक उपक्रम होत आहेत. मात्र, याच संकुलाशी संबंधित भूखंडाच्या वापराबाबत आता ईडीचा तपास सुरू असल्याने या प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणात आर्थिक व्यवहार, करारपत्रे, भूखंड वाटपाच्या अटी आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याचा पुढील तपास सुरू असून, आणखी मालमत्ता किंवा आर्थिक व्यवहार तपासाच्या कक्षेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news