महायुतीच्या 'रिपोर्ट कार्ड' मुळे विरोधकांची कोंडी !

Maharashtra Assembly Elections : प्रगतिपुस्तकातील प्रमुख मुद्दे
Maharashtra Assembly Elections
महायुतीच्या 'रिपोर्ट कार्ड' मुळे विरोधकांची कोंडी !File Photo
Published on
Updated on

मुंबई : सव्वादोन वर्षातील कारभार आणि विकासकाने हीच आमची ओळख असल्याचे सांगत महायुती सरकारने आपल्या कारभाराचे प्रगतिपुस्तक मांडले आहे. महायुती सरकारच्या वा रिपोर्ट कार्डची डिपोर्ट कार्ड अशा शब्दांत हेटाळणी शिवसेना ठाकरे गटातर्फे करण्यात आली असली तरी काही निवडक निकषांवर महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचाच कारभार कसा सरस होता, हे आकडेवारीनिशी दाखविण्याचा प्रभावी प्रयत्न महायुतीकडून केला गेला आहे. यामुळे महाविकास आघाडीचौ कोंडी झाली असून विकास आणि प्रगतीचा हा दावा खोडून काढण्यासाठी नविआला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आपला रिपोर्ट कार्ड मांडला. ४ दिवसांआधी रविवारी महाविकासआघाडीने गद्दारांचा पंचनामा नामक एक पुस्तिका जाहीर करीत महायुतीच्या कारभाराची चिरफाड करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे खंडन करण्यासाठी महायुतीने रिपोर्ट कार्ड जारी केला आहे. महायुती सरकारने आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये तुलनात्मचा आखडेवारी सादर करत विरोधकांच्या अनेक दाखल्यातील हवा काढून घेतली. महिला सशक्तीकरण, शेतकरी, युवा, शासकीय कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, आरोग्य, ग्रामीण विकास, शहरी क्षेत्रातील पायाभूत विकास अशा दहा आघाड्यांवर महायुती सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखाही मांडला. पासोयतय महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षे आणि महायुती सरकारच्या सव्वादोन वर्षातील कामगिरीची तुलना केली. दोन्ही सरकारांच्या काळात शेतकऱ्यांना मिळालेला मदतनिधी, आलेली परकीय गुंतवणूक अशा दहा मुद्यांच्या कामगिरीचा आढावा मांडला. या सर्व क्षेत्रांतील आकडेवारीच समोर आणत महायुतीने आपला कारभार महाविकास आघाडीच्या तुलनेत उत्तम असल्याचे दाखवून दिले.

विदेशी गुंतवणुकीत सरस कामगिरी नोव्हेंबर २०१९ ते जून २०२२ या कालावधीतील महाविकास आघाडी सरकारचे कामकाज आणि जून २०२२ ते ऑक्टोबर २०२४ या महायुती सरकारच्या कामकाजाची तुलना या महायुती सरकारने आपल्या रिपोर्टकार्डमध्ये केली आहे, उद्योग परराज्यात गेल्याचा विरोधकांचा आरोप पोकळ असल्याचे आकडेवारीतूनच मांडले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देशातील एकूण एफडीजायच्या तुलनेत महाराष्ट्रात २६.८३ टक्के गुंतवणूक आली. महायुतीच्या काळात हीच गुंतवणूक ३६.९० टक्के राहिली. महाविकात आघाडीच्या काळात स्थिर किमर्तीवर आधारित वास्तविक जीएसडीपीचा दर हा १.९ टक्के होता. त्यात महायुतीच्या काळात ६.६ टक्क्यांची वाढ झाली. या काळात हा दर ८.५ टक्क्यांवर पोहोचला.

मविआच्या तुलनेत शेतकऱ्यांना अधिक मदत महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकन्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी नुकसानभरपाई म्हणून केवळ ८ हजार ७०१ कोटी निधी वितरित करण्यात आले. महायुती सरकारने आपल्या कार्यकाळात १६ हजार ३०९ कोटी वितरित केला. मदत निधीतील वाढ ८० टक्के इतकी आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारने अवघे ३९६ रोजगार मेळावे घेत घेत ३६ हजाल युवांना रोजगार दिले. तर, महायुतीने आपल्या काळात १ हजार १३८ मेळावे घेतले. त्यातून १ लाख ५१ हजार ४०८ बुवांना रोजगार मिळाला, महायुती सरकारच्या काळातील रोजगार मेळाव्यांची संख्या तिपटीने वाढली. तर, रोजगार निर्मितीत ३१५ टक्के पाढ नोंदविली गेली. महाविकास आघाडी सरकारने स्वयं सहायता गटांना मदत म्हणून १३ हजार ९४१ कोटी दिले. तर, महायुतीने आपल्या काळात २८ हजार ८११ कोटींचा निधी दिला.

तुटपुंजे ठरविले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात गरिवासाठी ६.५७ लाख घरे बांधण्यात आली. महायुतीच्या काळात मात्र ही संख्या १०.५२ लाख इतकी आहे. एकूण ७५ टक्के अधिक घरे गरिबांसाठी निर्माण झाली. तर, शबरी आदिवासी घरकूल योजनेत मविआने १८ हजार ११९ घरांसाठी ४४७ कोटी ६२ लाखांचा निधी दिला. तर महायुती सरकारने आपल्या कार्यकाळात तब्बल १ लाख २५ हजार ६९९ घरांसाठी ७७१ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर केला. घराच्या संख्येत सात पट आणि निधी ७२ टक्के इतकी वाढ महायुतीने केली. महाविकास आघाडी सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत ४० हजार १८९ विद्यार्थ्यांना २२२ कोटींचा लाभ दिला. तर, महायुती सरकारने ९२ हजार ३८८ विद्यार्थ्यांना ४९२ कोटी कोर्टीचा लाभ दिला.

प्रगतिपुस्तकातील प्रमुख मुद्दे

महिला सशक्तीकरण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २.५ कोटी महिलांना दरमहा १५०० रुपये.

शेतकरी

नमो शेतकरी महासन्यान निधी योजना ९२.४३ लाख शेतक-यांना दरवर्षी १२,००० रुपये.

युवा

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना १० लाख विद्यार्थ्यांना ऑन-द-जॉब प्रशिक्षणासाठी दरमहा ६ ते १० हजारांचे विद्यावेतन

•राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ४.६२ लाख विद्यार्थ्यांना १ हजार २१८ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती

ज्येष्ठ नागरिक

पेन्शन योजना: ४५.६ लाख लाभार्थ्यांसाठी महिन्याच्या निवृ‌त्तीवेतनाची रक्कम एक हजार वरून दीड हजार करण्यात आली.

रोजगार

•अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १.०२ लाख उद्योजकांना एकूण ८४४.२८ कोटी रुपयांचे कर्ज वाटप • पोलिस कॉन्स्टेबलच्या १८ हजाल ३३१रिक्त पदांसाठी भरती पूर्ण, आणखी १७,४०१ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आरोग्य

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना ७०० आरोग्य केंद्रांवर मोफत आरोग्य तपासणी, औषधे, रक्त आणि प्रयोगशाळा चाचण्यांची सुविधा ग्रामीण विकास

समृद्धी महामार्ग हा ६०,७८८ कोटींचा १० जिल्हे आणि ३२० गावे ओलांडणारा ४०१ किलोमीटरचा द्रुतगतीने मार्ग पूर्णत्वाकडे.

उद्योगधंदे

थेट परकीय गुंतवणुकीत मागील दोन वर्षांत २.७३ लाख कोटींची गुंतवणूक मिळाली. भारतातील एकूण एफडीआय पैकी ४० टक्के महाराष्ट्रात, आपला महाराष्ट्र पुन्हा प्रथम क्रमांकावर

शहरी पायाभूत सुविधा

अटल सेतू हा भारताचा २१.८ कि.मी. लांबीचा सर्वात मोठा सागरी पूल हा १८ हजार ५९९ कोटींच्या खर्चात पूर्ण होऊन लोकार्पण झाले.

पुनर्विकास प्रकल्पांतर्गत १० लाख रहिवाशांसाठी २३,००० कोटी खर्चाचा धारावी पुनर्विकास प्रकल्प,

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news