लालबागमध्ये मद्यधुंद प्रवाशाने बेस्टचे स्टेअरिंग हिसकावून ९ जणांना उडवले; महिलेचा मृत्यू

संशयीत आरोपीस काळाचौकी पोलिसांनी घेतले ताब्यात
लालबागमध्ये मद्यधुंद प्रवाशाने बेस्टचे स्टेअरिंग हिसकावून ९ जणांना उडवले
लालबागमध्ये मद्यधुंद प्रवाशाने बेस्टचे स्टेअरिंग हिसकावून ९ जणांना उडवलेfile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लालबाग येथे मद्यपान करुन बस चालवून एका मद्यपीने काही वाहनांसह पादचाऱ्यांना धडक दिल्याने ९ जण जखमी झाले. त्यातील २ महिला गंभीर जखमी होत्या. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी दत्ता मुरलीधर शिंदे या संशयीत आरोपीस काळाचौकी पोलिसांनी ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला.

रविवारी रात्री रात्री साडेआठ वाजता ६६ क्रमांकाची बस लालबाग परिसरात आली होती. बस गरमखाडा परिसरात ही बस उभी असताना चालक कमलेश प्रजापती यांच्या बाजूला बसलेल्या दत्ता शिंदे नावाच्या व्यक्तीने बसचा ताबा घेतला आणि दारुच्या नशेत बस चालविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याने दोन ते तीन वाहनांना धडक दिली. बसच्या धडकेने सात ते आठ पादचाऱ्यांना दुखापत झाली होती. दोघांची दुखापत गंभीर होती, तर सहाजणांना प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले होते. त्यातील एका महिलेचा आज सकाळी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी मद्यप्राशन करुन बस चालविणाऱ्या दत्ता शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news