मुंबई विमानतळावर टांझानियाच्या प्रवाशाकडून 7.51 कोटींचे ड्रग्ज जप्त

कस्टम विभागाची मोठी कारवाई
Drug Seized
प्रवाशाकडून जप्त करण्यात आलेले कोकेनPudhari photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री केलेल्या कारवाई मध्ये मोठा ड्रग्सचा साठा जप्त केला आहे. यामध्ये टांझानियाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून 751 ग्रॅम कोकेन. सोने आणि विदेशी चलन जप्त केले आहे. हा एकुण मुद्देमाल अंदाजे 8.47 कोटी रुपयांचा असल्याची माहिती कस्टम विभागाने दिली आहे. याप्रकरणी दोन प्रवाशांना अटक देखील करण्यात आली आहे.

Drug Seized
तोतया कस्टम अधिकारी जाफर इराणीला पुणे पोलिसांकडून बेड्या

कारवाईवेळी सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी संशयास्पद हलचाल वाटल्यामुळे टांझानियाहून येणाऱ्या एका प्रवाशाला रोखले आणि त्याची तपासणी केली तेव्हा त्यांच्याकडून 751.00 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. या जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत अंदाजे 7.51 कोटी रुपये आहे. या प्रवाशाने ड्रग्ज लपवण्यासाठी त्यातील काही कॅप्सूल खाल्ले देखील होते. प्रवाशाला नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अंतर्गत अटक करण्यात आली आहे. तसेच एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) च्या अधिकाऱ्यांनी मुंबईहून दुबईला निघालेल्या प्रवाशाला अडवले. झडतीदरम्यान त्यांच्याकडून 1 लाख सौदी रियाल जप्त करण्यात आले ज्याची अंदाजे किम्मत 22.4 लाख रुपये आहे. प्रवासाने ट्रॉली बॅग मध्ये ठेवलेल्या कपड्यांमध्ये हे पैसे लपवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news