Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबाराचे ठाणे कनेक्शन

१४वा आरोपी गणेश लांडगेच्या अटकेने खळबळ; दोन गावठी पिस्तुले, १९ काडतुसे जप्त
Tiger Shroff
Tiger Shroff Pudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे : अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहणाऱ्या गणेश श्रीकांत लांडगे (३१) याला १४ वा आरोपी म्हणून अटक केली आहे. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुले आणि १९ जिवंत काडतुसे जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, गणेशचा बिश्नोई गँगशी किंवा गोळीबाराच्या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला असून, घटनेच्या दिवशी तो कारागृहात असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे.

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने आग्रीपाडा परिसरात कारवाई करून गणेश लांडगे याला अटक केली. त्याच्यासोबत असलेले अन्य तीन जण पोलिसांना चकवा देऊन पसार झाल्याची माहिती आहे. गणेशकडून दोन गावठी पिस्तुले आणि १९ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. न्यायालयाने त्याला १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, या अटकेनंतर गणेशच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Tiger Shroff
Sonali Kulkarni : राज्‍यात फक्त मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहे असावीत

१८ ऑक्टोबर रोजी टायगर श्रॉफ यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार झाला, त्यावेळी गणेश एका किरकोळ भांडणाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. ३१ तारखेला कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो मुंबईत गेला होता. त्यामुळे गोळीबार प्रकरणाशी त्याचा संबंध जोडणे चुकीचे असल्याचे गणेशच्या आईने म्हटले आहे. आपल्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवले जात असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप खांबे यांनीही पोलिसांच्या तपासावर आक्षेप घेतला आहे.

गणेश सराईत गुन्हेगार नसून त्याचा कोणत्याही टोळीशी संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला. गणेशच्या जीवाला काही धोका निर्माण झाल्यास त्याला पोलीस प्रशासन आणि गृहमंत्री जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कुटुंबीयांकडून त्याच्या निर्दोषत्वाचा दावा केला जात आहे. गोळीबाराच्या दिवशी तो खरोखरच कारागृहात होता का, जप्त केलेल्या शस्त्रांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे आणि त्याचे अन्य आरोपींशी नेमके कोणते संबंध आहेत, या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणार आहेत.

Tiger Shroff
Shrirampur Water Supply: श्रीरामपूरकरांना मोठा दिलासा! ८ दिवस दररोज पाणीपुरवठा; त्यानंतर आठवड्यातून तीन दिवस पाणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.