Babasaheb Ambedkar Jayanti 2026: चैत्यभूमीवर आज निळा सागर; डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांची मुंबई पालिकेकडून चोख व्यवस्था

Babasaheb Ambedkar Jayanti 2026
Babasaheb Ambedkar Jayanti 2026Pudhari
Published on
Updated on

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती मुंबईसह उपनगरांत आज, मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. चैत्यभूमीसह चेंबूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्यानातील पुतळा व इतर ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

महामुंबईसह राज्यभरातून आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर येणार असल्याने त्यांची गैरसोय हाऊ नये म्हणून मुंबई महापालिकेकडून चैत्यभूमी, राजगृह आणि अन्य ठिकाणी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Babasaheb Ambedkar Jayanti 2026
School Bus Drivers Oppose New Rules: शालेय बस नियमांवर चालक संघटनांचा रोष; आर्थिक बोजा, व्यवहार्यतेवर तीव्र आक्षेप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी आदी मान्यवर सकाळी 9.30 वाजता पुष्प अर्पण करून अभिवादन करतील.

घाटकोपर, चेंबूर, वडाळा, कांदिवली, मालाड, गोरेगाव अशा विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सकाळी अभिवादन करून संध्याकाळी कुठे पुणेरी ढोल, तर कुठे नासिक बाजा, बेंजो पार्टी, डीजमुळे चैतन्यात मिरवणुका काढण्यात येणार आहेत. चेंबूर येथील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला व उद्यानाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे.

Babasaheb Ambedkar Jayanti 2026
MHT CET 2026 Registration: पीसीएम-पीसीबी सीईटीच्या नोंदणीला विशेष मुदतवाढ

छायाचित्र प्रदर्शन :

चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे करण्यात आले आहे. या प्रदर्शन दालनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासातील दुर्मिळ छायाचित्रे असणार आहेत. त्याचबरोबर या प्रदर्शन दालनात, संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक जीवनचरित्रावर आधारित कॉफी टेबल बुक देखील उपलब्ध असणार आहे.

समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण :

दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्युब या समाज माध्यम खात्यावरुन थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच, फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर) या माध्यमांवरुन देखील सहक्षेपण करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news