डोंबिवली : महिलांच्या पर्सवर डल्ला मारणाऱ्या रेल्वेतील चोरट्यास अटक

डोंबिवली : महिलांच्या पर्सवर डल्ला मारणाऱ्या रेल्वेतील चोरट्यास अटक
Published on
Updated on

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : मेल एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्समधून पैसे आणि दागिणे चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शहजाद सय्यद (30, रा. कल्याण पत्रिपुल) असे या संशयित आरोपीचे नाव आहे.

कल्याणहून कसारा आणि कजर्तच्या दिशेने जाणाऱ्या मेल एक्सप्रेसमध्ये काही दिवसांपासून प्रवासी महिलांच्या पर्स चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यानुसार कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या चोरीच्या घटनांचा तपास करत होते. तेव्हा कल्याण रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयीत पोलिसांच्या नजरेत आला. काही दिवसापूर्वी हा संशयीत रेल्वे स्थानकात फिरत असताना पोलिसांनी पाहिले होते. त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सांगितले. शहजाद सय्यद असे त्याचे नाव असून तोच या चोरी करत होता हे निष्पन्न झाले.

शहजाद हा मूळचा अजमेर येथे राहणारा असून सध्या तो कल्याणच्या पत्रीपूल परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत आहे. 2017 मध्ये अहमदाबाद पोलिसांनी शहजादला रेल्वेतील चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. हा देशभरात फिरून मेल एक्सप्रेसमध्ये प्रवास करुन महिलांच्या पर्सवर डल्ला मारतो. ही शहजादची चोरीची पद्धत असून त्याने कल्याण हद्दीत 13 चोऱ्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news