‌Mumbai Hospital News : ‘भगवती‌’मध्ये लहान मुलावर उपचार नाकारले

मनसेचा आक्रमक पवित्रा पाहताच डॉक्टरांची बोलती बंद झाली आणि त्यांनी तात्काळ मुलावर उपचार सुरू केले.
Doctor Refused Treatment
‘भगवती‌’मध्ये लहान मुलावर उपचार नाकारलेpudhari photo
Published on
Updated on

मुंबई :बोरिवली पश्चिमेकडील महानगरपालिकेच्या भगवती रुग्णालयात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. एका लहान मुलाच्या हाताला जखम झाल्याने त्याला रात्रीच्या वेळी प्राथमिक उपचार देण्यास रुग्णालयातील डॉक्टरांनी नकार दिला.

यामुळे भयभीत झालेल्या वडिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मनसैनिकांनी पोलिसांसह रुग्णालयात धडक दिली. मनसेचा आक्रमक पवित्रा पाहताच डॉक्टरांची बोलती बंद झाली आणि त्यांनी तात्काळ मुलावर उपचार सुरू केले.

Doctor Refused Treatment
Rising dengue cases : डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ, उपाययोजनांचा अभाव

मंगळवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास एका लहान मुलाच्या हाताला गंभीर जखम झाल्यामुळे त्याचे हतबल वडील त्याला घेऊन भगवती रुग्णालयात पोहोचले होते. तिथे उपस्थित असलेल्या आरएमओ डॉक्टरांनी कोणतीही विचारपूस न करता, रुग्णाला थेट कांदिवलीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले.

वडिलांनी जखमेला टाके मारण्यापूर्वी किमान वेदनाशामक किंवा प्राथमिक उपचार करण्याची विनंती केली. यावर डॉक्टरांनी यावर सेकंड ओपिनियन घ्या. आमच्याकडे ट्रीटमेंट होऊ शकत नाही,“ असे अत्यंत बेजबाबदार उत्तर देत, उपचार करण्यास नकार दिला होता.

लहान मुलगा वेदनेने तडफडत असतांना रुग्णालयाकडून प्राथमिक उपचार करण्यास नकार मिळाल्याने हताश झालेल्या वडिलांनी तात्काळ मनसेचे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि पोलीस तात्काळ भगवती रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात पोहोचले.

Doctor Refused Treatment
Ulhasnagar Crime |उल्हासनगर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून तोडफोड : डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

मनसे पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचारासाठी सेकंड ओपिनियन लागतं का? आणि रात्रीच्या अडीच वाजता सामान्य रुग्णाने कुठे जायचे? असा जाब विचारत रुग्णालयाला धारेवर धरले. मनसेचा रुद्रावतार पाहताच संबंधित डॉक्टरांची भंबेरी उडाली आणि त्यांनी तातडीने मुलावर उपचार सुरू केले.

दोषी डॉक्टराचे निलंबन करा

सरकारी रुग्णालयात गरिबांच्या आणि लहान मुलांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा मुजोर डॉक्टरांना पाठीशी घालू नका. त्या रात्री ड्युटीवर असलेल्या आणि नाव लपवणाऱ्या डॉक्टरचे नाव प्रशासनाने समोर आणावे आणि त्याच्यावर 24 तासांत निलंबनाची कारवाई करावी. अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,“ असा इशारा मनसे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news