Private Bus Ticket Price Hike : ऐन दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूटमार

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासाठी तिकीट दरांमध्ये वाढ
Travels Bus
Travels BusPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई : दिवाळी आणि खासकरून भाऊबीजेसाठी मुंबईहून कोकणात, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेचे तिकीट आणि एसटी बसची कमतरता असल्याने खासगी ट्रॅव्हल्स हाच एकमेव आधार उरला असताना खासगी बस चालकांनी तिकीट दरांमध्ये दुप्पट ते तिप्पट वाढ केली आहे. सर्वसामान्य प्रवाशांना नाईलाजाने खिशाला कात्री लावून हा महागडा प्रवास करावा लागत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या तोंडावर खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकिटांचे दर भडकवले आहेत. नियमित दिवसांमध्ये असणारे दर या दिवाळीत १,००० ते २,५०० रुपयांपर्यंत महागले आहेत. मुंबईहून कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नागपूर आणि कोकणातील विविध भागांत जाणाऱ्यासाठी प्रवाशांकडून तिकिटाची मागणी वाढू लागल्याने हे दर वाढविल्याचे ट्रॅव्हल्स एजन्टचे म्हणणे आहे.

Travels Bus
Gokul News : ‘गोकुळ’वर पाच शासकीय सदस्य; चौघांना मताधिकार

दिवाळीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या जाहीर केल्या असल्या, तरी त्यांचे बुकिंग सुरू होताच काही मिनिटांतच 'वेटिंग लिस्ट' चे बोर्ड झळकू लागले आहेत. एसटी महामंडळाने जादा बसेस सोडल्या असल्या तरी प्रवाशांची संख्या अधिक असल्याने त्या अपुऱ्या पडत आहेत. परिणामी, कुटुंबासह गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्या वाढीव तिकिटाला बळी पडावे लागत आहे.

Travels Bus
MBBS BDS Vacant Seats : एमबीबीएस, दंत अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी तीन विशेष फेऱ्या

प्रशासनाचे नियम काय ?

परिवहन विभागाने खासगी बसेसच्या तिकीट दरांवर ५०% पेक्षा जास्त वाढ न ठेवण्याची मर्यादा घातली आहे. प्रत्यक्षात मात्र ऑनलाइन बुकिंग ॲप्स आणि ट्रॅव्हल्स एजंट्सकडून उघडपणे प्रवाशांची लूट सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.