Dindoshi Court Escape: न्यायालयातून पळाला, रात्री थेट कारागृहात परतला! इब्राहिम मुजावर प्रकरणात नाट्यमय घडामोड

सुनावणीसाठी न्यायालयात आणलेल्या इब्राहिम मुजावरने पोलीस शिपायाच्या हातावर फटका देऊन पलायन केले; कुरार पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल
Dindoshi Court
Dindoshi Court Pudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: दिंडोशी सत्र न्यायालयातून इब्राहिम साजिद मुजावर नावाच्या आरोपीने शुक्रवारी सायंकाळी पलायन केले. मात्र रात्री याच आरोपीने आर्थर रोड कारागृहात जाऊन पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.

इब्राहिमवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून याच गुन्ह्यांत त्याला शुक्रवारी सुनावणीसाठी दिंडोशी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

कारागृहात नेत असताना त्याने पोलीस शिपायाच्या हातावर जोरात फटका देऊन पलायन केले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dindoshi Court
Bhendi Bazaar redevelopment: भेंडी बाजार क्लस्टर डेव्हलपमेंट योजना वैध; उच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना मोठा झटका

मिरारोडचे रहिवाशी असलेले निखिल निवृत्ती माने हे ताडदेव येथील सशस्त्र पोलीस दलात पोलीस शिपाई आहेत. शुक्रवारी त्यांना आर्थर रोड कारागृहातून आरोपीला दिंडोशी न्यायालयात ने-आण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. दुपारी साडेबारा वाजता त्यांना इब्राहिमचा ताबा देण्यात आला होता. त्यानंतर दुपारी दोन वाजता ते त्याला घेऊन न्यायालयात आले होते.

त्याची सुनावणी संपल्यानंतर त्याला सरकारी वाहनाजवळ आणण्यात येत होते. तिथेच तो दोन महिलांशी बोलून वाहनाजवळ जात होता. यावेळी इब्राहिमने निखिल माने यांच्या हाताला जोरात धक्का देऊन तेथून पलायन केले होते.

Dindoshi Court
Tiger Shroff Flat Sale: टायगरने विकला फ्‍लॅट; खार पश्चिमेतील आलिशान फ्लॅटचा ९ कोटींचा व्यवहार

हा प्रकार लक्षात येताच त्यांच्यासह इतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेनंतर त्यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुम, ताडदेव येथील सशस्त्र विभाग, संरक्षण कार्यालयात ही माहिती सांगितली होती. त्यानंतर ते कुरार पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी इब्राहिम मुजावरविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना रात्री तो आर्थर रोड कारागृहात आला आणि त्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्याला ताब्यात घेऊन पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले. ही माहिती नंतर आंबोली आणि कुरार पोलिसांना देण्यात आली आहे. त्याचा लवकरच कुरार पोलिसांकडून ताबा घेतला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news