

पुढारी ऑनलाईन डेस्क: Anjali Damaniya vs Dhananjay Munde | माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राज घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचा आकस्मिक मृत्यू झाला. पण त्यांचा नेमका मृत्यू कसा झाला हे गुलदस्त्यात आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट नाही, त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित केले आहेत. या संदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून शेअर केली आहे.
दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "राज घनवट हे धनंजय मुंडे यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत. ह्याच राज घनवटने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत. याच जमिनीच्या चौकशीची मागणी मी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली होती. ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते".