Dharavi Redevelopment Project: “उद्याची धारावी कशी दिसणार? एक्सपिरियन्स सेंटरमध्ये पाहता येणार ३डी वॉकथ्रू आणि नमुना घरे”

धारावी एक्सपिरियन्स सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन
Dharavi Redevelopment Project
Dharavi Redevelopment ProjectPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीचे औचित्य साधत शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धारावी एक्सपिरियन्स सेंटरचे उद्‍घाटन करण्यात आले. धारावीच्या पात्र रहिवाशांना या नमुना घरांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश करून आपले नवे घर अनुभवता येईल, प्रस्तावित टाऊनशिपचा ३डी वॉकथ्रू पाहता येईल, आणि गृहनिर्माण, उपजीविका, सार्वजनिक सुविधा व खुल्या जागा कशा प्रकारे एकत्रित नियोजित केल्या जात आहेत हे देखील अनुभवता येईल.

ख्यातनाम गीतकार प्रसून जोशी यांनी रचलेल्या धारावी गानचे (अँथम) अनावरणही मुख्यमंत्र्यांनी केले आणि आशियातील सर्वात मोठ्या अनधिकृत वस्त्यांपैकी एक असलेल्या धारावी आणि तिथल्या १० लाखांहून अधिक रहिवाशांचा गौरव करणाऱ्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

Dharavi Redevelopment Project
Mumbai Protest | मुंबईतील आंदोलनाला नसीरुद्दीन शाह, विशाल ददलानी, शबाना आझमींची उपस्थिती

उद्याच्या धारावीची सफर

२२,५०० चौ. फूट क्षेत्रफळात पसरलेले धारावी एक्सपिरियन्स सेंटर हे पुनर्विकासानंतरची धारावी कशी असेल याचेच मूर्तिमंत दर्शन घडवते. प्रत्यक्ष आकारातील घरांची मॉडेल्स, डिजिटल डिस्प्ले आणि परस्परसंवादी प्रदर्शनांच्या माध्यमातून पुनर्विकास योजनेची थेट माहिती या केंद्रातून मिळते. एक सविस्तर ३डी वॉकथ्रू म्हणजे उद्याच्या धारावीची सफर.

त्यात निवासी व व्यावसायिक क्षेत्रे, रस्ते, वाहतूक दुवे, सार्वजनिक सुविधा आणि खुल्या जागा दर्शवल्या जातात. मुंबईच्या अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या आणि त्याला योगदान देणाऱ्या येथील व्यवसाय व उद्योजकतेवर ही सफर प्रकाश टाकते.

Dharavi Redevelopment Project
MSRTC Travel Pass : एसटीचा ‘आवडेल तेथे प्रवास’ पास आता ऑनलाईन

या केंद्राच्या मध्यभागी प्रत्यक्ष आकाराची नमुना घरे आहेत. अभ्यागत ३५० चौ. फूट आणि ५०० चौ. फुटांच्या अलंकृत (furnished) आणि विना-अलंकृत (unfurnished) अपार्टमेंट्समध्ये चालून प्रस्तावित लेआउट अनुभवू शकतात आणि जागांचा कसा वापर केला जाऊ शकतो हे समजू शकतात.

हे केंद्र मिठी नदीचे प्रस्तावित पुनरुज्जीवन, धारावीतील सुमारे ४०,००० झाडे आणि ३.३ किमी लांबीचा सार्वजनिक नदीकिनारा (रिव्हरफ्रंट) यावरही भर देते. विविध वाहतूक साधनांना एकत्र आणून रहिवाशांसाठी आणि इतर मुंबईकरांसाठी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी डिझाइन केलेल्या 'मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब'चाही यात समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news