.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : बदलापूर येथील घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक स्तरावरील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत.
बदलापूर स्थानकांवर आंदोलक संतप्त झाले असून दगडफेक सुरू केली आहे. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलनाला आज (दि. २०) दुपारी १ च्या सुमारास हिंसक वळण लागले. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुरू केला. तर आंदोलकांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला.